CoronaVirus Lockdown: Three-foot-tall husband and four-foot-tall bride rkp
Lockdown : एका लग्नाची गोष्ट; तीन फुटाचा नवरा अन् चार फुटाची नवरी! By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 11:19 PM1 / 8तीन फुटाचा नवरा आणि चार फूट उंच असलेल्या नवरीचा विवाह सोहळा धुळ्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या भरवाडे येथे मोठ्या दिमाखात पार पडला.2 / 8मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये चर्चा झाली, ती म्हणजे त्या दोघांच्या उंचीची. 3 / 8शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील 29 वर्षीय झांबरु राजेंद्र कोळी आणि चार फूट उंची लाभलेली कुरखळी येथील 19 वर्षीय नयना कैलास कोळी यांचा विवाह तापी काठी जोगाई माता मंदिरात पार पडला.4 / 8झांबरु कोळी आणि नयना यांच्या लग्नात त्यांच्या जवळील नातेवाईक उपस्थित होते.5 / 8धुळे जिल्ह्यात सध्या या सर्वात कमी उंचीच्या नवरा आणि नवरीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.6 / 8दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लोकांची मोठी गर्दी होईल, असे समारंभ करण्यास सरकारने बंदी घातली आहे.7 / 8मात्र, कोरोनाची स्थिती पाहून संबंधित ठिकाणी कमी लोकांच्या उपस्थित लग्न समारंभ करण्यास परवानगी आहे. 8 / 8मात्र, कोरोनाची स्थिती पाहून संबंधित ठिकाणी कमी लोकांच्या उपस्थित लग्न समारंभ करण्यास परवानगी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications