शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : आजारी आहात?, चिंता विसरा आता घरबसल्या मोफत चेकअप करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:53 AM

1 / 14
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्ण संख्या तब्बल पाच लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या आकडेवारीने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.
2 / 14
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18522 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 384 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 15685 जणांना जीव गमवावा लागला आहे.
3 / 14
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 52 हजार 765 झाली असून बळींचा आकडा 7 हजार 106 इतका झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.25 टक्के झाले आहे.
4 / 14
राज्यात मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मुंबईत रुग्णांनी 72 हजारांचा टप्पा गाठला आहे. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही कारण घरबसल्या मोफत चेकअप करता येणार आहे.
5 / 14
कोरोनामुळे खासगी रुग्णालये बंद आहेत. सर्वसामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे.
6 / 14
ॲप तयार झाल्याने त्याचा फायदा अनेकांना घेता येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करता येईल. दरम्यान, आतापर्यंत 1600 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
7 / 14
राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.
8 / 14
मोबाईल ॲप महिनाभरात तयार करण्यात येईल असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार एक महिन्याच्या आत हे ॲप तयार झाले आहे.
9 / 14
राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो.
10 / 14
केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 या काळात उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नाही
11 / 14
ई-संजीवनी ओपीडी ॲपमध्ये मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात.
12 / 14
एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो. नंतर लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटिफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.
13 / 14
डॉक्टरांशी चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते अशा पद्धतीने घरबसल्या रुग्णांना मोफत चेकअप करता येणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी याची मदत होणार आहे.
14 / 14
महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 5 हजार 24 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेMaharashtraमहाराष्ट्रtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलdoctorडॉक्टर