CoronaVirus Marathi News man steal ppe from hospital in wak of raincoat
CoronaVirus News : काय सांगता? रेनकोट समजून चोरलं पीपीई किट अन् झालं असं काही... By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 11:04 AM1 / 12देशात कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 19 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही 19,64,537 झाली आहे. 2 / 12देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 56,282 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 904 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 40,699 लोकांना जीव गमवावा लागला आहे.3 / 12कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, मास्क याच्या माध्यमातून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. 4 / 12देशातील कोरोनाग्रस्तांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहे. 5 / 12नर्स, डॉक्टर यांच्यासह आरोग्य सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना कोरोना रुग्णांची काळजी घेताना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी पीपीई किट घालण्यासाठी दिले जात आहे. 6 / 12रेनकोट समजून एका व्यक्तीने पीपीई किट चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या एका रुग्णालयात हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. 7 / 12पीपीई किट चोरणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं असून यामुळे कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 8 / 12नशेमध्ये व्यक्तीने पीपीई किट चोरल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीपीई किटची चोरी करणारी व्यक्ती भाजी विक्रेता आहे. नशेत असल्याने तो एका नाल्यात पडला. 9 / 12नाल्यात पडल्यावर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र याच दरम्यान त्याने रेनकोट समजून पीपई किट चोरले. 10 / 12घरी आल्यावर त्याने परिसरातील लोकांना 1000 रुपयांना नवीन रेनकोट घेतल्याचं खोटं सांगितलं. मात्र त्याचवेळी काही जणांनी त्याला हा रेनकोट नसून पीपीई किट असल्याची माहिती दिली. 11 / 12आरोग्य अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ते पीपीई किट ताब्यात घेतले. तसेच भाजी विक्रेत्याची चाचणी करण्यात आली.12 / 12भाजी विक्रेत्याची कोरोनाचा चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. यानंतर तो ज्या परिसरात फिरला आहे त्याची माहिती अधिकारी घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications