CoronaVirus News: महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार?; दिलासादायक माहिती समोर By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 11:20 AM
1 / 10 राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव थांबताना दिसत नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाही. 2 / 10 कोरोनाची दुसरी लाट वेगानं पसरत असल्यानं राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू झाले. मात्र तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळालेली नाही. 3 / 10 बुधवारी राज्यात ५६ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. काल हा आकडा ६२ हजारांच्या पुढे पोहोचला. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 4 / 10 गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना मृतांचा आकडादेखील वाढत आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. 5 / 10 राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पुढील ५ ते १० दिवसांत कमी होईल, अशी शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्रासोबतच दिल्ली, पंजाबमधील कोरोनाची दुसरी लाटदेखील लवकरच ओसरेल, असा अंदाज आहे. 6 / 10 राज्य सरकारनं लागू केलेले कठोर निर्बंध आणि नागरिकांनी बाळगलेली सतर्कता याचा परिणाम लवकरच महाराष्ट्रात दिसून येईल, असं आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 7 / 10 महाराष्ट्र, दिल्लीमधील कोरोना रुग्णांची संख्या येत्या ५ ते १० दिवसांत घटेल. त्यामुळे आता केंद्रानं आपली संसाधनं बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडूसारख्या राज्यांत वापरायला हवीत, असं अधिकारी म्हणाले. 8 / 10 राष्ट्रीय स्तरावर एकाएकी कोरोनाचे रुग्ण कमी होणार नाहीत. स्थानिक, राज्य पातळीवर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 9 / 10 देशात सध्या कोरोनाचे नवे हॉटस्पॉट तयार झाले आहेत. दक्षिणेतील राज्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. त्यामुळे देशाचं टेन्शन वाढलं आहे. 10 / 10 कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्य सरकारांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र अद्याप तरी त्याचा परिणाम दिसून आलेला नाही. आणखी वाचा