CoronaVirus Shocking! only 8 patient spread virus in 1917 people in country hrb
CoronaVirus बापरे! केवळ 8 जणांनी तब्बल १९०० जणांना केले कोरोना पॉझिटिव्ह By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 1:33 PM1 / 11दिल्लीमध्ये निजामुद्दीन भागात तबलीगी जमातच्या हजारो लोकांनी १३ ते १५ मार्चला कार्यक्रम घेतला होता. यामध्ये अनेक परदेशी नागरिकही होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर देशातील लोक त्यांच्या घरी गेले. मात्र, बरेचजण कोरोना व्हायरस पॉझिटिव्हि आढळले. या लोकांमुळे जवळपास १६५० जणांना कोरोनाची लागण झाली. जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा या लोकांनी लपून राहणे पसंत केले. 2 / 11कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने उचललेली पाऊले धाडसी असली तरीही त्याची कडक अंमलबजावणी लोकांनी केली असती तर ही वेळ आली नसती. उद्या हे लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन सुरु होण्याची शक्यता अधिक आहे. लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार आणि राजस्थानला बसला आहे. या पाच राज्यांमध्ये केवळ आठ लोकांनी खळबळ उडवून दिली आहे. 3 / 11नोएडामध्ये सीजफायर या कंपनीनेही निष्काळजीपणाचा कहर केला आहे. कंपनीमध्ये कोरोनाचा कर्मचारी सापडला तरीही कंपनीने काम बंद केले नाही. यामुळे कंपनीच्या १३ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला. त्यांच्यामुळे घरच्यांनाही करोनाची लागण झाली. एकूण २४ जण कोरोनाच्या विळख्यात आल्यावर जिल्हा प्रशासनाने कंपनी सील केली. 4 / 11देशात कोरोना व्हायरसने हातपाय पसरू नये यासाठी राज्य सरकारांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केले होते. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना केवळ ८ जणांनी सुरुंग लावला आहे. या रुग्णांमुळे देशभरात तब्बल १९१७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य यंत्रणांच्या पायाखालची वाळूच पसरली आहे. 5 / 11मुंबईमध्ये एका ६५ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. ही महिला कार्पोरेट ऑफिसमध्ये डबे देत होती. तिच्याकडून डबे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 6 / 11जयपूरमध्ये रामगंजचा एक व्यक्ती ओमानहून १७ मार्चला परतला होता. तो सर्वांना भेटत राहिला. या तरुणामुळे त्याच्या कुटुंबाबरोबर कॉलनीतील तब्बल १२६ लोकांनी कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या तरुणाच्या मित्रामुळे १२ जणांना कोरोना झाला. अशाच प्रकारे भीलवाडामध्ये डॉक्टरला कोरोना झाल्याने अन्य १६ जण कोरोना पॉझिटिव्ह झाले. 7 / 11बिहारमध्ये मस्कतहून आलेल्या प्लंबरला कोराना झाला. त्याच्यामुळे २३ जणांना लागम झाली. मुंगेरमध्ये कतारहून आलेल्या ड्रायव्हरला कोराना झाला. त्याने आयसोलेट होण्याऐवजी आसपासच्या परिसरात फिरण्यास सुरुवात केली. यामुळे १३ जण पॉझिटिव्ह झाले. 8 / 11मेरठच्या लग्नामध्ये महाराष्ट्रातील अमरावतीचहून ५० वर्षीय व्यक्ती लग्न समारंभाला आला होता. त्याने ६ जणांना बाधित केले. बुलंदशहरला न गेल्याने तिथे अनर्थ टळला. 9 / 11सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आरोग्य विभागाच्या महिला सचिवानेच ३२ जणांना कोरोना बाधित केले. तिचा मुलगा अमेरिकेहून परतला होता. तिने ही गोष्ट प्रशासनापासून लपविली आणि बैठकांना हजेरी लावली. यामुळे आएएस अधिकाऱ्यांपासून कोरोनाबाधित झाले. भोपाळमध्ये ५० जणांना बाधा झाली आहे. 10 / 11पंजाबमध्ये जर्मनीहून आलेल्या एका ७० वर्षीय संतामुळे तब्बल ४० हजार लोकांनी क्वारंटाईन करावे लागले. १८ मार्चला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. 11 / 11केरळमध्ये दुबईहून आलेल्या तरुणाने एका लग्नाला हजेरी लावली. त्याच्या मित्राला कोरोना झाला होता आणि हा तरुण त्याच्या संपर्कात आला होता. ही गोष्ट त्याने लपवून ठेवली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications