coronavirus things allowed and facilities going to start from tomorrow in state kkg
CoronaVirus News: उद्यापासून नागरिकांना मिळणार अनेक सवलती; जाणून घ्या संपूर्ण माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 5:56 PM1 / 10एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'मिशन बिगिन अगेन'ची घोषणा केली. या अंतर्गत जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीनं विविध सवलती दिल्या जाणार आहेत.2 / 10घराबाहेरील व्यायामासाठी परवानगी असेल. समुद्र किनारे, खाजगी/सार्वजनिक मैदाने, उद्याने यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सायकलिंग/धावणे/जॉगिंगला काही अटींवर परवानगी असेल. 3 / 10मैदानावरील व्यायामासाठी सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सूट असेल. सामूहिक हालचालींना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र मोकळ्या मैदानात गर्दी करता येणार नाही.4 / 10प्लंबर, ईलेक्ट्रिशियन, पेस्ट-कंट्रोल, आणि इतर तंत्रज्ञ यांसारख्या व्यावसायिकांना कामं करता येतील. त्यासाठी मास्क वापरणं, शारीरिक अंतर राखणं बंधनकारक असेल.5 / 10गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये वाहनांच्या दुरूस्तीची कामं करता येतील. मात्र तिथे होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना अपॉईंटमेंट घ्यावी लागेल.6 / 10सर्व शासकीय कार्यालयांत १५ टक्के कर्मचारी अथवा १५ कर्मचारी (जी संख्या जास्त असेल त्यानुसार) काम करतील.7 / 10मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स व्यतिरिक्त बाजारपेठेतील अन्य दुकानं सकाळी ९ ते ५ वेळेत सम-विषमनुसार उघडी राहतील.8 / 10कपड्यांच्या दुकांनामधील ट्रायल रूम बंद राहतील. तसेच एक्सचेंज आणि माल परत करण्याचे धोरण अथवा सुविधा बंद असेल.9 / 10केवळ खरेदीसाठी चारचाकी वाहने घराबाहेर काढण्याला बंदी असेल.10 / 10विनाकारण लांब पल्ल्याचा प्रवास करण्यावर बंदी असेल. आणखी वाचा Subscribe to Notifications