शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cruise Drugs Case : कोण आहेत आर्यन खानला जामीन मिळवून देणारे वकील मुकुल रोहतगी? एका सुनावणीसाठी किती घेतात फी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 7:58 PM

1 / 10
क्रूज ड्रग्‍स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan khan) तब्बल 26 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. स्पेशल कोर्ट, लोअर कोर्ट आणि सेशन कोर्टाकडून आर्यन खानला जमानत मिळाली नव्हती. यामुळे गेली तीन दिवस मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. (know about Aryan khan lawyer Mukul Rohatgi)
2 / 10
मुंबई उच्च न्यायालयाने आज आर्यनसह ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मंजूर केला आहे. हे तिघेही उद्या किंवा परवा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील जोरदार युक्तीवादानंतर आर्यन खानला जामीन मिळाला आहे.
3 / 10
जामीन मिळाल्यानंतर देशाचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने 3 दिवस युक्तिवाद ऐकल्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला आहे. आशा आहे, की उद्या अथवा शनिवारी ते कारागृहातून बाहेर येतील.
4 / 10
महत्वाचे म्हणजे, सतीश मानशिंदे आणि अमित देसाई हे दोन दिग्गज वकील आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना स्पेशल कोर्ट, लोअर कोर्ट आणि सेशन कोर्टात जामीन मिळवून देऊ शकले नाही. अशात, आता माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या युक्तीवादानंतर, आर्यन खानला जामीन मिळाला. जस्‍ट‍िस नितिन साम्‍ब्रे यांच्या कोर्टात मुकुल रोहतगी यांच्यासह वकील सतीश मानश‍िंदे आणि अमित देसाईही उपस्थित होते.
5 / 10
मुकुल यांचा एनसीबीवर प्रहार - ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी नुकतेच आर्यन खानचे समर्थन केले होते. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळण्यापूर्वी, मुकुल रोहतगी यांनी म्हटले होते, की आर्यनला तुरुंगात ठेवण्यामागे कोणतेही न्याय्य कारण नाही. याच वेळी एनसीबीवर निशाणासाधताना ते म्हणाले होते, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) वाळूमध्ये डोके लपवून बसलेल्या 'शहामृगा'प्रमाणे आहे. आर्यनला सेलिब्रेटीचा मुलगा असल्याची किंमत चुकवावी लागत आहे.
6 / 10
कनिष्ठ वकील म्हणून सुरुवात - देशातील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेले मुकुल रोहतगी, यांनी मुंबईच्या शासकीय लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. येथून बाहेर पडल्यानंतर रोहतगी यांनी प्रसिद्ध वकील योगेश कुमार सभरवाल यांचे कनिष्ठ बनून प्रॅक्टीस सुरू केली. योगेश कुमार सभरवाल हे 2005-2007 पर्यंत देशाचे 36 वे सरन्यायाधीश होते. यानंतर, 1993 मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना सिनियर काउंसिलचा दर्जा दिला आणि यानंतर 1999 मध्ये रोहतगी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बनले.
7 / 10
गुजरात दगलीदरम्यान राज्य सरकारचा केला बचाव - मुकुल रोहतगी यांनी 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुजरात सरकारची बाजू मांडली होती. याशिवाय बनावट चकमक प्रकरणातही त्यांनी गुजरात सरकारच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद केला होता. याशिवाय त्यांनी बेस्ट बेकरी खटला, योगेश गौडा खून खटला, जाहिरा शेखचा खटलाही सर्वोच्च न्यायालयात लढला आहे.
8 / 10
देशाचे अॅटर्नी जनरल होते मुकुल रोहतगी - मुकुल रोहतगी यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 19 जून 2014 रोजी देशाचे अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त केले होते. मुकुल हे 18 जून 2017 पर्यंत देशाचे 14वे अॅटर्नी जनरल होते. त्यांचे वडील अवध बिहारी रोहतगी हे दिल्‍ली उच्च न्यायालचाचे न्यायाधीशही राहिले आहेत.
9 / 10
एका सुनावणीची फीस - माध्यमांतील वृत्तांनुसार, मुकुल रोहतगी हे आपल्या एक सुनवणीसाठी जवळपास 10 लाख रुपये फीस घेतात. पण, एका RTI मध्ये देण्यात आलेल्या उत्तरात महाराष्‍ट्र सरकारने सांगितले होते, की वरिष्ठ काउंसिल मुकुल रोहतगी यांना महाराष्ट्र सरकारने जज बीएच लोया केससाठी फीसच्या स्वरुपात 1.21 कोटी रुपये दिले होते.
10 / 10
आर्यन खान.
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानDrugsअमली पदार्थShahrukh Khanशाहरुख खानMumbai High Courtमुंबई हायकोर्ट