Disale Guruji's appreciation from the Education Minister and Deputy Chief Minister
देशाची मान उंचावली, शिक्षणमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून डिसले गुरुजींचं कौतूक By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 2:49 PM1 / 10 सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील डिसले गुरुजींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवला अन् त्यांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. 2 / 10काही दिवसांपूर्वी गुरुजींच्या नावाने स्कॉलरशीप सुरू करण्यात आली होती. तसेच, ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वरही त्यांची नेमणूक करण्यात आली होती. 3 / 10आता जागितक बँकेच्या शिक्षण सल्लागार समितीवरही त्यांना नेमण्यात आलं आहे. त्यामुळे, एका जिल्हा परिषदेच्या गुरुंजींनी गगनभरारीच घेतल्याचं दिसून येतंय. 4 / 10ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. 5 / 10जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 6 / 10त्या कामात आता झेडपीच्या गुरुजींचं योगदान असणार आहे. जगभरातील 12 व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आली आहे. त्यामध्ये बार्शीच्या डिसले गुरुजींचा समावेश आहे. 7 / 10या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21 व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं डिसले गुरुजींनी सांगितले. 8 / 10 जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. 9 / 10राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून डिसले गुरुजींच्या या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. 10 / 10डिसले गुरुजींनी जगात देशाची मान उंचावली, असे अजित पवार यांनी ट्विट करुन म्हटलंय. तर, वर्षा गायकवाड यांनीही ट्विट करुन, कौतुकास्पद असल्याचं म्हटलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications