Do you also have two voting cards? Imprisonment may be imposed
तुमच्याकडेही आहेत दोन मतदान कार्ड? भोगावा लागू शकतो तुरुंगावास! By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 1:48 PM1 / 7मतदानासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीकडे दोन किंवा अधिक मतदान ओळखपत्रे असणे हा गुन्हा मानला जातो.2 / 7मतदानासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीकडे दोन किंवा अधिक मतदान ओळखपत्रे असणे हा गुन्हा मानला जातो. 3 / 7कायदेशीररीत्या एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त मतदान ओळखपत्र बाळगू शकत नाही. वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन मतदान ओळखपत्रे असलेला नागरिक आढळल्यास त्याला एक वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकतात.4 / 7बनावट मतदान रोखण्यासाठी आणि बनावट मतदान कार्ड ओळखण्यासाठी निवडणूक आयोगाने आधार कार्डसोबत मतदान कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.5 / 7अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे एकच मतदान ओळखपत्र ‘आधार’शी लिंक करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, बऱ्याचदा मतदारयादीतून नाव गाळले जाऊ शकते. त्यामुळे आपले नाव मतदारयादीमध्ये आहे की नाही, हे तपासून पाहणे गरजेचे आहे.6 / 7अनेकदा कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या पत्त्यांवरून बनवलेले मतदान ओळखपत्र मिळते. एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहत असेल तर त्याला त्या जागी बनवलेले मतदान ओळखपत्र मिळते. 7 / 7तीच व्यक्ती नंतर नोकरी किंवा इतर कारणामुळे दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होते. त्या व्यक्तीला प्रथम मतदान ओळखपत्र रद्द न करता दुसऱ्या ठिकाणाहून बनवलेले मतदान ओळखपत्र मिळते. एकाच वेळी दोन वेगवेगळे मतदान कार्ड असणे कायद्याने गुन्हा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications