शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्याकडे Ration Card नाहीये?; काळजी करू नका, घर बसल्याही बनवता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 1:03 PM

1 / 10
कोरोनाच्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं गरीब कुटुंबांना मोठा दिलासा दिला होता. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) देशात मोफत रेशन देण्यात येत आहे.
2 / 10
सरकारनं ४ महिने म्हणजेच नोव्हेंबर पर्यंत मोफत रेशन देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ देशातील ८० कोटी नागरिकांना देण्याचा सरकारचा मानस आहे. या अंतर्गत गरीबांना ५ किलो मोफत रेशन देण्यात येणार आहे.
3 / 10
ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशाच लोकांना याचा फायदा घेता येणार आहे. अशातच जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन रेशन कार्डासाठीही (Apply Online for Ration Card) अर्ज करू शकता.
4 / 10
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्व राज्यांच्या आपल्या वेबसाईट आहेत. तुम्ही ज्या राज्यामध्ये राहत असाल त्या राज्यात जाऊन तुन्ही रेशन कार्डासाठी अर्ज करू शकता. पाहा स्टेप बाय स्टेप कशी आहे ही प्रोसेस.
5 / 10
रेशन कार्डासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्हाला प्रथम त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्हाला mahafood.gov.in यावर क्लिक करावं लागेल.
6 / 10
त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Apply online for ration card या ऑप्शनवर क्लिक करा. रेशन कार्डासाठई आयडी प्रुफ म्हणून तुम्हाला आधार कार्ड, व्होटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करता येऊ शकतो.
7 / 10
रेशन कार्डासाठी अर्ज करण्याचं शुल्क ५ रूपयांपासून ४५ रूपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करा आणि त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
8 / 10
फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज पडताळणीत योग्य असेल तर तुमचं रेशन कार्ड तयार केलं जाईल.
9 / 10
केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत तुम्हाला रेशन त्याच दुकानातून दिलं जाईल, ज्या दुकानात तुम्ही रेशनकार्डाचा वापर करून रेशन घेता.
10 / 10
जर तुमच्या रेशन कार्डावर ४ जणांची नावं असतील तर सर्वांना मिळून ५ किलो प्रति व्यक्ती प्रमाणे २० किलो रेशन मिळेल.
टॅग्स :foodअन्नGovernmentसरकारonlineऑनलाइनInternetइंटरनेटMaharashtraमहाराष्ट्र