शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत भीमसैनिकांचं बाबासाहेबांना अभिवादन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 8:10 PM

1 / 10
संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या दहशतीखाली असताना, भारतातही या संकटाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. २५ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन आज संपणार होता. मात्र, तो ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.
2 / 10
या पार्श्वभूमीवर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात राहूनच साजरी करण्याचं आवाहन सर्व नेतेमंडळींनी केलं होतं. त्याला भीमसैनिकांनी अगदी सकारात्मक प्रतिसाद दिला. (फोटोः तन्मय ठोंबरे))
3 / 10
दरवर्षी बाबसाहेबांच्या जयंतीला नागपूरमधील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी जमतात आणि महामानवाला अभिवादन करतात. मात्र, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आज कुणीही घराबाहेर पडलं नाही.
4 / 10
कोरोना संकटावर मात करण्यासाठी घरी राहणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळणं अपरिहार्य होतं आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी आपलं हे कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं. (फोटोः तन्मय ठोंबरे))
5 / 10
दीक्षाभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
6 / 10
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळही दरवर्षी आंबेडकर जयंतीला गर्दी असते. तिथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी येतात. मात्र, यंदा हा परिसरही शांत होता.
7 / 10
मुंबईत चैत्यभूमीवरही अनेक भीमसैनिक बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जातात. मात्र, यंदा सगळ्यांनी घरच्या घरीच बाबासाहेबांना वंदन केलं.
8 / 10
काही जणांनी घरातच संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं, तर काहींनी घरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. (फोटोः सुशील कदम)
9 / 10
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
10 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ ट्विट करून बाबासाहेबांना अभिवादन केलं. तसंच, देशाला संबोधित करताना त्यांनी राष्ट्रनिर्मितीतील डॉ. आंबेडकरांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे