Due to heavy rain in Sangli, Kolhapur, flood situation in the city
सांगली, कोल्हापुरात महापूर; शहरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत- पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 10:12 AM1 / 6मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये अनेक नद्यांना पूर आला आहे. 2 / 6सांगली जिल्ह्यातील 21 पूल पाण्याखाली आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. 3 / 6२४ जुलै १९८९ रोजी पंचगंगा नदीचे पाणी पंचगंगा रुग्णालयाच्या मारूती मंदिराजवळ आले होते . इथपर्यंत पुराचे पाणी कधीच आले नव्हते. त्यामुळे महापालिकेने तेथे त्या घटनेची खूण म्हणून एक शिळा लावली. सोमवारी मध्यरात्री त्या ठिकाणी पुराचे पाणी पोहोचले. 4 / 6पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.5 / 6सांगलीतील पुरामुळे एसटी स्टँडमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. 604 एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 6 / 6 पंचगंगा नदीला पूर आल्याने पुणे-बंगळुरु हायवेवर पाणी आलं आहे. शिरोळनजीक पुलावर पाणी साचल्याने बंगळुरुकडे जाणारी वाहतूक किणी टोलनाक्याजवळ थांबविण्यात आली आहे आणखी वाचा Subscribe to Notifications