ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १९ - नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील तरूणीवर बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेले आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली असून या घटनेचे सभागृहात तीव्र पडसाद उमटले. याच मुद्यावरून विधानपरिषदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे भाषण करत होते. कोपर्डी प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दखल, तसेच राज्यातील सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्यावरून ते बोलत असताना राष्ट्रवादीचे यवतमाळचे आमदार संदीप बाजोरिया हे मात्र सभागृहात झोपा काढत होते. स्त्रियांच्या सुरक्षेसारख्या इतक्या महत्वाच्या मुद्यावर चर्चा सूरू असतानाही आमदार साहेब मात्र निवांतपणे झोपले होते. चर्चा सुरू असताना बाजोरिया झोपल्याचे लक्षात आले असता त्यांना चिठ्ठी पाठवून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. एकीकडे विरोधी पक्षाचा एक नेता या मुद्यावरून सरकारला धारेवर धरत असताना दुसरा नेता मात्र झोपा काढत असल्यामुळे विरोधकांना खरोखर या घटनेचं गांभीर्य आहे की फक्त ही घटना सरकारविरोधात मुद्दा म्हणून वापरला जात आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. विरोधकांना खरोखरचं कोपर्डीच्या घटनेचे गांभीर्य आहे का ? तुम्हाला काय वाटते? धनंजय मुंडेच्या भाषणादरम्यान डुलकी काढणारे बाजोरिया चिठ्ठी पाठवून उठवण्यात आल्यानंतर बाजोरिया सभागृहाबाहेर पडले. थोड्यावेळाने फ्रेश होऊन बाजोरियांनी पुन्हा आसन ग्रहण केले. विरोधकांना खरोखरचं कोपर्डीच्या घटनेचे गांभीर्य आहे का ? तुम्हाला काय वाटते?