शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Eknath Shinde Next CM of Maharashtra: साधा रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; असा आहे एकनाथ शिंदेंचा प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 5:31 PM

1 / 8
Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. त्यांच्या या घोषणामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कोणीच विचार केला नव्हता, असा निर्णय आज झाला आहे. जाणून घेऊन एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास...
2 / 8
एकनाथ संभाजी शिंदे ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (2009, 2014, 2019) आणि त्यापूर्वी ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (2004) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
3 / 8
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते 1980 मध्ये शिवसेनेत दाखल झाले होते. एक साथा रिक्षा चालक ते शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.
4 / 8
9 फेब्रुवारी 1964 रोजी शिंदे यांचा जन्म झाला झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतर मंगला हायस्कूल येथून माध्यमिक शिक्षण घेतले. विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेचे काम सुरू केले.
5 / 8
आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. 1986 मध्ये झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदेंना बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना 40 दिवस कारावास झाला होता.
6 / 8
1997 मध्ये त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदी विजयी झाले. 2001 मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. 2001 ते 2004 अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. यानंतर 2004 साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली.
7 / 8
या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते.
8 / 8
यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. 2014च्या युती सरकारमध्ये आणि 2019च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे नगरविकास खात्याची जबाबादारी देण्यात आली. यानंतर आता त्यांची थेट मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे