The fierce ‘Agnitandav’ at the Serum Institute; Five people lost their lives
निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 8:42 PM1 / 11सहा मजली इमारतीतील वरच्या दोन मजल्यांवर इलेक्ट्रीक व पाईपिंगचे काम सुरु होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येथील चौथ्या मजल्यावर आग लागली. त्याबरोबर आग आग असा कामगारी आरडा ओरडा केला. काही जण तातडीने बाहेर पडले. काही जणांनी तिसर्या मजल्यावरुन दुसर्या मजल्यावर उड्या मारुन आपला जीव वाचविला. ( सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे, लोकमत) 2 / 11अग्निशमन दलाला दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी सिरम इन्स्टिट्युटमध्ये आग लागल्याची खबर मिळाली. त्याबरोबर अग्नीशमन दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. 3 / 11आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. धुराचे हे लोट काही किमी अंतरावरुन दिसत होते. 4 / 11आगीचे दृश्य बघण्यासाठी घटना स्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी 5 / 11अग्निशमन दलाला दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी सिरम इन्स्टिट्युटमध्ये आग लागल्याची खबर मिळाली. त्याबरोबर अग्नीशमन दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. 6 / 11धुरामुळे जवानांना आत प्रवेश करणे अशक्य होत होते. जवानांनी इमारतीच्या खिडक्यांची काचेची तावदाने फोडली.7 / 11आगीचे स्वरुप लक्षात घेऊन अग्निशमन दलाकडील उंचावर पाण्याचा मारा करुन शकणार्या हॅड्रोलिक गाड्या आणण्यात आल्या. त्याच्या सहाय्याने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला8 / 11१२ गाड्या, ६ खासगी वॉटर टँकरसह हॅडोलिक गाड्यांमार्फत सुमारे २ तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले. 9 / 11आगीच्या घटनेची माहिती मिळताच सिरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर प्रचंड गर्दी जमा झाली होती. तसेच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता 10 / 11सिरम इन्स्टिट्युटमध्ये सध्या कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन करण्यात येत आहे. ही लस देशभरात तसेच शेजारील राष्ट्रांमध्ये पुरविली जात आहे. त्या ठिकाणी आग लागल्याचे संपूर्ण जगभराचे लक्ष या आगीकडे लागले. केंद्रीय गृहमंत्रालयाने याची दखल घेऊन त्याबाबत चौकशी केली.11 / 11मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या सिरमच्या कामगारांनी सांगितलेला अनुभव अंगावर शहारे आणणारा होता. आणखी वाचा Subscribe to Notifications