शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अखेर २८ दिवसांनी शरद पवारांनी आखली 'चाणक्य'नीती; भाजपा-अजितदादांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 9:57 AM

1 / 11
काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि समर्थक आमदारांनी राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांनी थोरल्या पवारांशी फारकत घेत मंत्रिपदाची शपथ घेतली.
2 / 11
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजितदादांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शरद पवारांशी दोनदा भेट घेऊन शरद पवारांनी भाजपासोबत यावे यासाठी दबाव बनवला.
3 / 11
परंतु भाजपाशी हातमिळवणी करण्याचा शरद पवारांनी ठाम नकार दिला. पवारांनी पुन्हा मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आता महाराष्ट्रात दौरा सुरू करणार आहेत. आता शरद पवारांनी अजित पवार आणि भाजपाला कमकुवत करण्यासाठी चाणक्य रणनीती आखल्याचे समोर आले आहे.
4 / 11
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी शांत बसण्याची खेळी खेळली. राजकारणात पवार गेम पलटवणार असे बोलले गेले. आता शरद पवारांनी योजलेल्या प्लॅनिंगनुसार सर्वकाही घडले तर भाजपाला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया शरद पवारांचे ३ प्लॅन
5 / 11
प्लॅन १ - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार पुन्हा पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत. सूत्रांनुसार, शरद पवार यांनी यासाठी तीन प्लॅन आखले आहेत. पहिल्या प्लॅनुसार शरद पवार पक्षाची पुनर्बांधणी करतील, म्हणजेच संघटनात्मकदृष्ट्या पुन्हा मजबूत करतील.
6 / 11
राज्यातील महत्त्वाच्या जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शरद पवार यांच्या सभा होणार आहेत. या भागातील जनतेशी शरद पवार संवाद साधणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या भागात शरद पवार सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार आहेत. या ठिकाणी आमदार, खासदार किंवा मोठे नेते गेले तरी कार्यकर्ते आणि जनता त्यांच्यासोबत राहतील याची काळजी शरद पवार घेतील.
7 / 11
प्लॅन २ - शरद पवार यांच्या दुसऱ्या प्लॅनप्रमाणे ते लवकरच पर्यायी नेतृत्व तयार करणार आहेत. पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व तयार केले जाणार आहे. पक्षाच्या माजी आमदारांना पुन्हा सक्रिय करणार आहेत. त्यांना पक्षाकडून ताकद आणि रसद पुरविली जाईल. माजी आमदारांनी निवडणूक लढवावी यासाठी शरद पवार आग्रही राहणार आहेत. त्यासाठी त्यांना तयार केले जाईल.
8 / 11
प्लॅन ३ - शरद पवारांची तिसरी योजना भाजपासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. ज्या माजी आमदारांना भाजपाने तिकीट नाकारले किंवा ज्यांना यावेळी तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे, अशांना शरद पवार सोबत घेणार आहेत. या माजी आमदारांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
9 / 11
भाजपाने अनेक माजी आमदारांकडे दुर्लक्ष केले आहे. ते निवडणूक लढविण्यास तयार होतील. भाजपचे अनेक माजी आमदार सध्या उंबरठ्यावर आहेत. राजकारणात पुन्हा सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या पण पक्षाची साथ मिळत नसल्याने अशा माजी आमदारांवर शरद पवार लक्ष केंद्रित करणार आहेत.
10 / 11
खरे तर इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेऊन भाजपामध्ये चांगली पदे देण्यात आली असली तरी पक्षात आधीपासून असलेल्या नेत्यांकडे भाजपाचे लक्षच नाही. शरद पवार या असंतुष्ट आणि अस्वस्थ नेत्यांवर आणि माजी आमदारांवर लक्ष ठेवून आहेत
11 / 11
शरद पवार त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या माजी आमदारांना फोडण्यात शरद पवार यशस्वी झाले तर भाजपाची डोकेदुखी वाढू शकते. विद्यमान आमदारांचा सामना करण्यासाठी शरद पवार माजी आमदारांमध्ये डाव लावणार आहेत मात्र यात शरद पवार कितपत यशस्वी होतात हे पाहावे लागेल.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार