ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - महाराष्ट्र सरकारचा जलसंधारण विभाग आणि कार्टूनिस्ट कंबाईन वेलफेअर असोसिएशनने घेतलेल्या कार्टून स्पर्धेत विवेक प्रभूकेळुसकर या व्यंगचित्रकाराच्या कलाकृतीला पहिले पारितोषिक मिळाले आहे. तर कपिल घोलप यांच्या व्यंगचित्राला दुसरे व अनीश वाकडे यांच्या व्यंगचित्राला तिसरे पारितोषिक मिळाले आहे.महाराष्ट्राला सलग दुसऱ्या वर्षी भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवा, जलप्रदूषण असे विषय देण्यात आले होते. राज्यभरातून अक्षरश: शेकडो व्यंगचित्रकारांनी उत्कृष्ट व्यंगचित्रे पाठवली. सगळी व्यंगचित्रे इतकी चांगली होत की परीक्षकांचे काम अवघड झाले अशी भावना कार्टूनिस्ट कंबाईन वेलफेअर असोसिएशनच्या प्रभाकर वाईरकरांनी सांगितले. विवेक प्रभूकेळुसकरांचे व्यंगचित्र कपिल घोलप यांचे व्यंगचित्र अनीश वाकडे यांचे व्यंगचित्र