शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किल्ले विजयदुर्ग

By admin | Published: February 07, 2016 12:00 AM

1 / 7
विजयदुर्ग किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून तटाची उंची ३६ मीटर एवढी आहे.
2 / 7
सुमारे ४० किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.1653 मध्ये आदिलशाहीतून स्वराज्याच्या काळात कब्जात घेतला आणि त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या.
3 / 7
२०० मीटरचा समुद्रातुन बाहेर निघण्यासाठी भुयारा मार्ग आहे. गडाचा तट सुस्थितीत असून त्यावर चढण्यास जागोजागी पायर्‍या असल्यामूळे संपूर्ण गडास व्यवस्थीत तटफेरी मारता येते.
4 / 7
विजयदुर्गास तिहेरी तटबंदी असून गडाच्या पश्चिम तटाबाहेर मोठे दगड टाकून लाटांच्या मारापासून तटबंदीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे
5 / 7
पाण्यात पसरलेला ऐतिहासिक वैभवशाली सामर्थ्यवान मराठवाडयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला सिंधुदूर्ग जिल्हयाच्या उत्तरेला टोकाला आहे.
6 / 7
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाघोटण खाडीच्या दक्षिणेस समुद्रात शिरलेल्या एका मोठ्या खडकावर विजयदुर्ग किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्यास घेरीया असंही नाव आहे. या किल्ल्यास २००६ साली ८०० वर्षे पूर्ण झाली.
7 / 7
विजयदुर्ग हा किल्ला राजा भोज (दुसरा) यांनी ११९३ - १२०५ रोजी स्थापन केला शिवाजी महाराज यांनी त्याची पुर्णबांधणी केली आहे. नुकतेच तिथे किल्ला या मराठी चित्रपटाचे शुटींग झाले आहे. आपण या किल्लयाविषयी जाणून घेऊ. (सर्व फोटो लोकमतचे छायाचित्रकार निर्माण चौधरी डॉ. अदित्य अकेरकर यांनी काढलेले आहेत.)