शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganesh Chaturthi 2018: 'गणपती घराघरात - गणपती मनामनात'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 8:22 PM

1 / 8
देशभरात आज गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे, गणेश भक्तांकडून लाडक्या बाप्पांची मूर्ती वाजत गाजत आणण्यात आली.
2 / 8
केवळ मंडळाचेच नाही, तर घरात 10 दिवस मुक्काम करणाऱ्या गणरायाचेही बाप्पा मोरयाच्या जयघोषात आगमन झाले
3 / 8
सँड आर्टीस्टने वाळूचा बाप्पा साकारून प्लॅस्टीकमुक्त आणि प्रदुषण मुक्त गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे
4 / 8
गणेशोत्सवाचा आनंद हा सगळीकडे सारखाच असतो, राजाच्या महालात आणि गरिबाच्या झोपडीतही बाप्पांच्या आगमनाचा उत्साह सारखाच असतो हेच या फोटोतून दिसून येते.
5 / 8
गणरायाचे थाटामाटात आगमन झाल्यानंतर बाप्पांची मूर्ती घरात विराजमान करण्यात आली. तर गणरायाच्या आरासासाठी सजावटही करण्यात आली आहे.
6 / 8
कुणी वाजत गाजत रस्त्याने, कुणी दुचाकीवरुन तर कुणी चारचाकीतून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणले
7 / 8
गणरायाच्या आगमनाचा आनंद हा चिमुकल्यांच्याही चेहऱ्यावर दिसून येत आहे, गणपती बाप्पा मोरया....
8 / 8
परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते, गणरायाच्या मूर्तीची मनोभावे पूजा करताना काय बरं मागत असेल ही चिमुकली बाप्पाकडे
टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव