शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 4:50 PM

1 / 8
पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत.
2 / 8
गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी (23 सप्टेंबर) सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसत आहेत.
3 / 8
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून मानाच्या पहिल्या कसबा व मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतींचे मंडई येथून प्रस्थान झाले आहे. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.
4 / 8
कोल्हापूरमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर, फुगडीचे फेर धरत, लेझीम खेळत उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला.
5 / 8
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक ही केवळ डीजे आणि गुलाल उधळणीला फाटा दिल्यामुळे आदर्श ठरली.
6 / 8
'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या,' अशा जयघोषाने सोलापूर नगरी दुमदुमली आहे. सकाळपासूनच सोलापूर शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला थाटात प्रारंभ झाला आहे.
7 / 8
नंदुरबारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांना सकाळपासून सुरुवात झाली आहे. दोनशे पेक्षा अधिक सार्वजनिक तर 500 पेक्षा अधिक खासगी मंडळांतर्फे मिरवणुका सुरू आहेत.
8 / 8
खामगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीस रविवारी अकरा वाजता सुरुवात झाली. मिरवणुकीत सर्वात आधी मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणारा लाकडी गणपतीची पालखी आहे.
टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनMumbaiमुंबईPuneपुणेNashikनाशिकkolhapurकोल्हापूर