नाशिक : गुढीपाडव्यानिमित्त नाशिक शहरात परंपरेनुसार गोदाकाठावर महारांगोळी आकाराला आली आहे. पहाटे सहा वाजेपासून उगवत्या दिनकराच्या साक्षीने गुढी उभारून महारांगोळी काढण्यास प्रारंभ करण्यात आला होता. नववर्ष स्वागत समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी प्रमुख पाहूणे म्हणून महापौर रंजना भानसी, सिडकोच्या प्रशासक कांचन बोधले, परमहंस सद्गुरू वेणाभारती महाराज आदि उपस्थित होते.गोदाकाठावरील जुन्या भाजी बाजार पटांगणावर १२५ महिलांच्या सहभागातून महारांगोळी काढण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता रांगोळी पुर्णत्वास आली. नारोशंकर मंदिराच्या समोर महारांगोळी आकाराला आली आहे. सध्या ही रांगोळी नाशिककरांच्या व्हॉटस्अॅपवरून व्हायरल होत आहे.