शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुढीपाडवा सेलिब्रेशन

By admin | Published: April 08, 2016 12:00 AM

1 / 6
कुठे ढोल-ताशांचे पथक कुठे भगव्या पताका नाचवणारी तरुणाई कुठे आकर्षक चित्ररथ तर कुठे पारंपरिक वेशभूषेत पहाटेपासूनच रस्त्यावर उतरलेला जनसागर पाहायला मिळतो
2 / 6
नववर्षांच्या स्वागताला शोभायात्रा देखील काढली जाते. मुंबईत विलेपार्ले गिरगाव ठाणे डोंबिवली तर कोकणात रत्नागिरी चिपळूण खेड या ठिकाणच्या शोभायात्रा विशेष प्रसिद्ध आहेत
3 / 6
दारी उभारलेली गुढी हे मांगल्याचं पवित्र्याचं समृद्धीचं प्रतिक आहे. या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अभिष्टचिंतन ही केले जाते. या गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.
4 / 6
चैत्र प्रतिपदा हा दिवस साडेतीन मुहुर्तातला एक म्हणून या दिवसाला महत्त्व आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ इत्यादी गोष्टी केल्या जातात सुवर्ण खरेदी हा त्यातलाच एक भाग.
5 / 6
पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.
6 / 6
गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे.