How did Bangladeshi porn star Rhea Barde become a resident of Thane? Inside Story
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 3:03 PM1 / 10Porn Star Riya Barde : आज सकाळी बांगलादेशी पॉर्न स्टार आरोही बर्डे उर्फ बन्ना शेख हिला मुंबई पोलिसांनी अटक केली. उल्हासनगर येथून तिला ताब्यात घेतले. बनावट कागदपत्र देऊन पासपोर्ट काढल्याचा आरोप तिच्या विरोधात करण्यात आला आहे. 2 / 10या प्रकरणी आयपीसी 420, 465, 468, 479, 34 आणि 14अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया मूळची बांगलादेशी असून तिची आई, भाऊ आणि बहीण बनावट कागदपत्रे बनवून भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप आहे.3 / 10 बांगलादेशी असूनही रियाच्या आईने भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न केल्याचे समोर आले आहे.4 / 10पोलिसांनी या प्रकरणात रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख यांनाही आरोपी केले आहे. 5 / 10रिया अनेक प्रोडक्शन हाऊसशी संबंधित असून तिने अनेक पॉर्न फिल्म्समध्ये काम केले होते. याशिवाय रियाला पॉर्न इंडस्ट्रीत आरोही या नावानेही ओळखले जाते.6 / 10रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी असून ती आपल्या दोन मुली रिया आणि मुलासह भारतात अवैधरित्या राहत होती. रियाच्या आईने अमरावती येथील रहिवासी असलेल्या अरविंद बर्डे यांच्याशी विवाह केला.7 / 10त्यांनी पश्चिम बंगालचे रहिवाशी असल्याचा दावा केला आणि नंतर स्वत: आणि तिच्या मुलांसाठी बनावट जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे बनवून भारतीय नागरिकाचा पासपोर्ट मिळवला.8 / 10रियाचे आई आणि वडील दोघेही सध्या कतारमध्ये राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले, तर पोलीस तिच्या भावाचा आणि बहिणीचाही शोध घेत आहेत. रियाला यापूर्वी मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत अटक केली होती.9 / 10रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मूळची बांगलादेशची असून बेकायदेशीररीत्या देशात राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासली आणि त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.10 / 10भारतीय पासपोर्ट बनवल्यानंतर त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आरोही बर्डेवर आहे. भारतीय नागरिकत्वाचा गैरवापर केल्याचा आरोपही तिच्यावर आहे. याशिवाय अरविंद शामराव बर्डे नावाच्या व्यक्तीचाही पोलिस शोध घेत आहेत. अरविंद याने सर्व बनावट पासपोर्ट तयार केल्याचा आरोप आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications