शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उन्हाळ्यात पाणी किती प्याल? अतिपाणी शरीराला धोकादायक; तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:56 IST

1 / 8
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने तहान वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला आहे.
2 / 8
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे तहान खूप लागते. अशावेळी घरातील पाण्याबरोबरच शहाळ्याचे पाणी आणि फळांचा रस, लिंबू सरबत घेतले जाते. ते शरीरासाठी आवश्यक असते. कारण शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राखले जाते.
3 / 8
ज्यांना हृदय विकार असेल किंवा ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी मात्र, पाणी कमी घेतले पाहिजे. अन्यथा हृदयावर ताण निर्माण होतो किंवा मूत्रपिंडातून पाणी जाण्याची प्रक्रिया काहीशी अडचणीची ठरते.
4 / 8
सामान्यतः उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढत असली तरी ज्यांना हृदय रोग किंवा किडनीचा त्रास नाही, अशांनी तीन लिटर्स पाणी सहजपणे प्यावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
5 / 8
शरीर हायड्रेट असणे चांगले- शरीर हायड्रेट असले पाहिजे. शरीरातील सोडीयम किंवा कॅल्शियमचे प्रमाण ठरलले असते ते कमी किंवा जास्त होऊ नये, यासाठी पाणी किती घ्यावे हे महत्त्वाचे असते.
6 / 8
डिहायड्रेशन आणि ओव्हर डिहायड्रेशन हे शरीराला घातक असतात. ओव्हर हायड्रेशनमुळे हायपोनेट्रेमिया होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी किती पाणी घ्यावे, याबाबत वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा असतो.
7 / 8
सामान्य नागरिक पाणी जास्त घेत असले तरी मुळात तहान लागल्यानंतरच पाणी पित असल्याने अडचण नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.
8 / 8
नारळ पाणी उत्तमच- उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, फळांचा रसदेखील आवश्यक असतो. मात्र, अशी फळे नैसर्गिक असावी आणि त्याचा नैसर्गिक रस असावा. बाटलीबंद प्रीझर्व केलेले अन्न किंवा रस दिले जातात.
टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य