शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दरमहा १०००० मिळणाऱ्या 'लाडका भाऊ योजने'साठी अर्ज कसा करायचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 12:26 PM

1 / 10
लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत, तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तसेच पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे.
2 / 10
याविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, 'हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल,' असं म्हटलं आहे.
3 / 10
या योजनेअंतर्गत तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
4 / 10
मात्र ही रक्कम सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार नाही. जे विद्यार्थी कंपनीत अप्रेन्टिसशिप करतील त्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ही रक्कम मिळणार आहे. अप्रेन्टिसशिप करणाऱ्या बारावी उत्तीर्ण, डिप्लोमाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना सरकार स्टायपंड म्हणून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम देणार आहे.
5 / 10
अप्रेन्टिसशिपची रक्कम स्वतः राज्य सरकार देणार असून या योजनेची तीन गटांमध्ये निधीची वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरुन करता येणार आहे.
6 / 10
इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना नवीन युजरचा पर्याय निवडल्यावर त्यामध्ये नाव, पत्ता आणि वयोगट ही माहिती भरावी.
7 / 10
या योजनेसाठी उमेदवाराचे वय १८ व कमाल ३५ वर्ष असणे आवश्यक आहे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय/ पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी होऊ शकत नाही.
8 / 10
तसेच उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. यासोबत उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
9 / 10
तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला ६ महिन्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ देणार असून यासोबत तुम्हाला पगाराचा लाभ मिळू लागेल.
10 / 10
तसेच या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून १० दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर त्याला त्या महिन्याने वेतन मिळणार नाही. तसेच विद्यार्थी पहिल्याच महिन्यात सोडून गेल्यास तो योजनेसाठी पुढे पात्र ठरणार नाही.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारStudentविद्यार्थी