I am with you as big brother, take care Pankajatai, says dhanajay munde
'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच, पंकजाताई काळजी घ्या' By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 1:22 PM1 / 11भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. 2 / 11गेल्या 4 ते 5 दिवसांपासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. आज, त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. 3 / 11दोन दिवसांपूर्वीच पंकजा यांनी अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. 4 / 11मी कोरोना पॉझिटीव्ह झाले असून अगोदरच विलीकरणात आहे, कोरोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेन. 5 / 11माझ्या समवेत दौऱ्यात असणार्यांनी टेस्ट करून घ्यावी, काळजी घ्यावी, असे ट्विट पंकजा यांनी केलं आहे. 6 / 11पंकजा यांच्या ट्विटनंतर कार्यकर्त्यांनी त्यांना काळजी घ्या आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांच्या ट्विटवर अनेकांना तशा कमेंट केल्या आहेत. 7 / 11बीड जिल्ह्यात सध्या शासनानं अत्याचार करायचं ठरवलंय अन् प्रशासनाने हात टेकले आहेत. हे कॉम्बिनेश बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आत्ताच्या परिस्थिती अत्यंत भयानक आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. 8 / 11पंकजा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेबद्दल संताप व्यक्त केलाय. तसेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड जिल्ह्याकडे जातीनं लक्ष द्यावे, अशी विनंतीही पंकजा यांनी केली होती. 9 / 11सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडें यांनी ट्विट करुन पंकजा मुंडेंना धीर दिला आहे. तसेच, मी भाऊ म्हणून कायम तुमच्या पाठिशी असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. 10 / 11ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या. 11 / 11मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या पंकजाताई असे ट्विट मुंडेंनी केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications