शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

... तर मी अदानींचं विमानही चालवलं असतं, रोहित पवारांचं असंही प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 9:32 PM

1 / 10
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. विधानसभा अधिवेशनात त्यांनी सातत्याने यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आंदोलनही केले.
2 / 10
या एमआयडीसीबाबतचे आंदोलन आणि जागेवरुनही भाजपचे माजीमंत्री आणि आमदार राम शिंदे व रोहित पवार यांच्या वार-पलटवार पाहायला मिळाले. एकाच मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि माजी आमदार असल्याने दोघांमध्ये राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत आहे.
3 / 10
आता, रोहित पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल राम शिंदे यांनी टिपण्णी केली होती. त्यावर, रोहित पवार यांनी आपली बाजू मांडली आहे.
4 / 10
मतदारसंघात उद्योग, इंडस्ट्री आणायची असेल तर उद्योजकांना भेटलंच पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले. यावरुन एकच गोष्ट सिद्ध होते की, मतदारसंघामध्ये एखादी मोठी कंपनी, एखादा उद्योग किंवा फॅक्टरी कोणी आणू शकतं. तर, ज्याला इंडस्ट्रीबद्दल काही कळतं.
5 / 10
काहीप्रमाणात ज्यांचे संपर्क या मोठ्या व्यावसायिक लोकांशी आहेत, त्यांनाच इथे मतदारसंघात मोठी गुंतवणूक करता येते, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
6 / 10
उद्योगपती गौतम अदानी बारामतीला आले होते, त्यावेळी त्यांची गाडी मी चालवली होती. मला विमान चालवायला येत असतं तर तेही मी चालवलं असतं, असा टोलाही आमदार पवार यांनी राम शिंदेंना लगावला.
7 / 10
तसेच, प्राध्यापक शिंदेंना एवढाच आक्षेप असेल तर केंद्रातील त्यांचे जे मोठे नेते आहेत, त्यांच्याशी त्यांनी चर्चा करावी. मात्र, मतदारसंघात मोठे बिझनेस आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे, ते आल्याशिवाय राहणार नाही. एमआयडीसीचाही प्रश्न लवकर मार्गी लागेल, त्यासाठी मी पाठपुरावा करेल, असेही ते म्हणाले.
8 / 10
टँकरसंदर्भात त्यांनी विधान केलं की, ते पालकमंत्री असताना ५ हजार टँकर अहमदनगर जिल्ह्यात होते. आम्हाला याचाच आक्षेप आहे,
9 / 10
टँकरमध्ये पाणी नसतानाही त्यासाठीचे पैसे कुठे गेले, घोटाळा कसा झाला? असा प्रश्न विचारत यासंदर्भात आपण लक्षवेधी लावली आहे, त्यावरही चर्चा होईल, असेही आमदार पवार यांनी सांगितले.
10 / 10
आमदार रोहित पवार यांनी बारामतीत अदानींच्या गाडीचे सारथ्य केले होते
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसGautam Adaniगौतम अदानीRam Shindeराम शिंदे