शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोलिसांपासून वाचण्यासाठी IAS पूजा खेडकरांच्या आईने केलं धक्कादायक कृत्य; अटकेमागची INSIDE STORY समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 4:02 PM

1 / 8
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची फरार असलेली आई मनोरमा खेडकर यांना आज पुणे ग्रामीण पोलिसांनी महाड तालुक्यातील पाचाड हिरकणीवाडी येथील एका लॉजमधून अटक केली आहे.
2 / 8
प्रोबेशन पीरियडवर असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एक एक कारनामे बाहेर येत आहेत. तर त्यांची आई मनोरमा खेडकर याही वादग्रस्त प्रकरणात अडकल्या आहेत.
3 / 8
पुणे येथे एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचे प्रकरण गाजले असून पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर मनोरमा खेडकर या फरार झाल्या होत्या. पुणे ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत होते.
4 / 8
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पाचाड हिरकणी वाडी येथील एका लॉजमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक पहाटेच मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी दाखल झाले.
5 / 8
मनोरमा खेडकर यांना लॉजमधून पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात नेले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.
6 / 8
मनोरमा खेडकर आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती रात्री साडेनऊ वाजता हिरकणी वाडी इथं आले. तेथील पार्वती हॉटेल इथं बनावट नावाने दोघेही राहिले.
7 / 8
दादासाहेब ढाकणे व इंदुताई ढाकणे अशी नावे त्यांनी मालकाला दिली. तसे आधारकार्ड देखील दाखवले. खोली क्रमांक दोनमध्ये हे दोघे राहिले. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे पोलीस हिरकणी वाडी इथं पोहोचले. त्यांनी इथल्या सर्व लॉजेसची कसून तपासणी केली.
8 / 8
अखेर मनोरमा खेडकर ज्या हॉटेलमध्ये राहिल्या होत्या तिथे पोलीस पोहोचले. मनोरमा खेडकर याच ठिकाणी राहत असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी साडेसहा वाजता त्यांना ताब्यात घेऊन पोलीस पथक पुण्याकडे रवाना झाले.