शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्हीही करताय नात्यात लग्न, तर व्हा सावधान; तज्ज्ञ म्हणतात, नात्यात लग्न नकोच, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 10:51 AM

1 / 10
नात्यात लग्न करताय तर आताच सावधान व्हा. अशा लग्नामुळे अनुवांशिक आजाराचे प्रमाण वाढते. नात्यातील विवाहामुळे अपत्याला गतिमंदतेसह इतर आजारांचा धोका असतो. वंशपरंपरेने किंवा अनुवांशिकतेने जनुकांद्वारे मात्या पित्याकडून अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होत असतात.
2 / 10
एका पिढीतून पुढच्या पिढीत त्याचे परिणाम दिसून येतात. अनुवंशिक आजारासह मुलांचा बुद्ध्यांक कमी राहण्याची भीती निर्माण होतेय. त्यामुळे तज्ज्ञांनी नात्यात लग्न नकोच असा सल्ला लोकांना दिला आहे.
3 / 10
ज्यांचे लग्न नात्यात झाले आहे त्यांनी घाबरून जाऊ नये; पण अनुवंशिक आजार टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. गरोदर राहण्याचा निर्णय घेताना त्याआधी तीन महिने फोलिक अॅसिड, सप्लिमेंट्स घ्याव्यात.
4 / 10
जेनिटिक कौन्सिलर किंवा आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांना नात्यात लग्न झाल्याचे सांगून सल्ला घेऊन पुढील उपचार करता येतात. नात्यातील लग्नातून झालेल्या मुलांचा बुद्ध्यांक इतर मुलांपेक्षा कमी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
5 / 10
बाळांमध्ये अनुवंशिक आजारांचे प्रमाण जास्त आढळून येते. प्रजननशक्तीवर परिणाम होऊ शकतो गर्भपाताचे प्रमाण वाढू शकते. स्टील बर्थ (बाळाचे गर्भातील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते) आदी धोका निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे
6 / 10
थॅलेसेमिया'चाही धोका - थॅलेसेमिया हा एक रक्तविकार आहे. यामध्ये लहान मुलांच्या शरीरातील लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य पद्धतीने होत नाही. सोबतच या पेशींचे आयुष्य देखील कमी असते
7 / 10
नात्यात लग्न नकोच - आपल्याकडे नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे. महाराष्ट्रात जवळपास २५ टक्के लग्न हे जवळच्या नात्यामध्ये होतात. त्यात विशिष्ट समाजात याचे प्रमाण खूप जास्त आहे.
8 / 10
मात्र, जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात अनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. इतर आरोग्यविषयक समस्या जास्त असू शकतात. वंशपरंपरेने किंवा अनुवांशिकतेने जनुकांद्वारे मात्या- पित्याकडून अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होत असतात.
9 / 10
एका पिढीतून पुढच्या पिढीत वहन होत असते. बीटा थैलेसेमिया व्याधीत १ बीटा थॅलेसेमिया जनूक आई किंवा वडिलांकडून अपत्यात येते व काही वेळा दोघांकडून १/१ जनूक येते. परिणामी, होणाऱ्या बाळाला थॅलेसेमियाची व्याधी होते.
10 / 10
जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाया अपत्यात अनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. टोझोनल रेसेसिव्ह आजारांचे प्रमाण जास्त असते. मुलांचा बुद्ध्यांक इतर मुलांपेक्षा कमी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. शक्यतो जवळच्या नात्यात लग्न टाळलेलेच बरे असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील सांगतात.
टॅग्स :marriageलग्न