Inauguration of 'Mahajobs' portal by Chief Minister, job opportunities
नोकरीची संधी एका क्लिकवर; जाणून घ्या, कसं आहे 'महाजॉब्स' पोर्टल By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 2:10 PM1 / 11मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. उद्योजक आणि अकुशल, अर्ध-कुशल, कुशल मनुष्यबळ यामधील दरी कमी करण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल आहे.2 / 11या पोर्टलची खालील उद्दिष्ट्ये म्हणजे - नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा. निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.3 / 11उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे. महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.4 / 11महाजॉब्स हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभाग यांचा, रोजगार शोधणार्यांना उद्योजकांशी जोडण्यासाठीचा संयुक्त उपक्रम आहे. 5 / 11महाजॉब्स उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत करते.6 / 11कोविड-१९ हे केवळ आरोग्य संकट नव्हे तर आर्थिक संकट म्हणून जागतिक पातळीवर ओळखले गेले. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. 7 / 11भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५% वाटा म्हणून देशातील सर्वाधिक उद्योग असणार्या महाराष्ट्राला उद्योगप्रक्रिया सातत्याने सुलभ व उद्योगप्रेमी ठेवण्याची गरज आहे. सध्याच्या संकटाला उत्तर देताना उद्योगाच्या मनुष्यबळाच्या गरजा भागविणे आवश्यक आहे.8 / 11कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन उद्योगाच्या दृष्टीकोनातून राज्याचे आर्थिक पुनरुज्जीवन करणे हे महाजॉब्सचे लक्ष्य आहे.9 / 11महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे10 / 11महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे11 / 11या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार केले गेले आहे. नोकरी शोधणा-या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा महाजॉब्सचा सातत्याने प्रयत्न आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications