ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ०३ - लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘नॉलेज सिरीज’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत अॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ हे विशेष चर्चासत्र मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. भारत आणि पाकिस्तानदरम्यान चालणाऱ्या शांतीप्रक्रियेला वैचारिक बळ प्रदान करण्यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे हे चर्चासत्र आयोजित केले होते. भारत-पाकिस्तानच्या वर्तमान संबंधांबाबत नागरिकांना ऐकायचे व समजून घेण्याचा आमचा उद्देश होता. ६९ वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या भारत-पाक या दोन भावांनी एकमेकांशी प्रेमाने राहावे, असे दोन्ही देशातील लोकांना वाटते. त्यामुळेच या दोन्ही देशात सुरू असलेल्या शांतीप्रक्रियेवर जनतेचे बारीक लक्ष असते. त्याच पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र झाल्यामुळे नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. 06:26PM - दोन्ही देशानी मिळून एकत्र चॅनेल काढणे ही खा. विजय दर्डांची सूचना स्वागतार्ह आहे. ही सूचना कठीण नाही पण एकत्रित पुढाकार महत्वाचा आहे - अब्दुल बासित 06:23PM - सार्क समीटमध्ये आशादायक चित्र समोर येईल, आशा करुया - अब्दुल बासित 06:21PM - नवाज शरीफ get well soon. त्यांची बायपास सर्जरी झालीय आहे - विवेक काटजू 06:19PM - भाजपसाठी आम्ही जास्त काम सोडलेले नाही. ते आमचेच काम समोर नेत आहेत - प्रियांका चतुर्वेदी 06:13PM - एक पाऊल समोर टाकणे जास्त महत्वाचे - शेषाद्री चारी 06:11PM - पाईपलाईन करारावर सह्या झाल्या आहेत. पण अफगाणिस्थानची जी अवस्था आहे . ती चिंताजनक.पण भारताकडून अफगांमध्ये विधायक कार्य सुरु आहे. तेथे जाण्याचा मोदींचा निर्णय स्वागतार्ह आहे. यापुढे भारत पाक चर्चा झाली तर अफगाणिस्तान वर चर्चा व्हावी. - विवेक काटजू 06:13PM - दोन्ही देशाची समस्या आपण तिस-याकडे नेतो. एकमेकांमध्येच चर्चा व्हावी. तसेच, प्रेम आणि डिप्लोमसीमध्ये जास्त बोलणे योग्य नाही - शेषाद्री चारी 06:08PM - चर्चासत्रात बोलताना... 06:01PM - जम्मू काश्मीरचा मुद्दा फार वेगळा आहे. हा केवळ जागेचा मुद्दा नाही तर लोकांच्या भावनांशी जुळला आहे. त्याला बाजूला ठेऊन चर्चा शक्य नाही - अब्दुल बासित. 05:59PM - शांती हेच आपले लक्ष्य. हे सबंध आपल्यासाठी महत्वाचे, प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर नक्की यश मिळेल - अब्दुल बासित 05:57PM - दोन्हीं देशात लहान- लहान बाबींच्या पुढाकारातून सकारात्मक वातावरण निर्मिती होते - अब्दुल बासित. 05:53PM - भारतात पाकचे चित्रपट प्रदर्शित व्हावे. तेथील मालिका इथे दाखवल्या गेल्या पाहिजे. तसेच, मनोरंजन वाहिन्याही याठिकाणी दाखवल्या गेल्या पाहिजे - अब्दुल बासित. 05:50PM - दळणवळण सुविधा खराब असून ती सुधारावी अशी अपेक्षा आहे. तसेच, व्हिसाची संख्या वाढवली जाऊ शकते - अब्दुल बासित. 05:48PM - भारतात काहीही दुर्घटना झाली की थेट निष्कर्ष तयार करण्यात येतात, असे होऊ नये. आम्ही पण दहशतवाद विरोधात आहोत - अब्दुल बासित 05:44PM - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीनंतर आशा निर्माण झाली होती. पण, पठाणकोट हल्ल्यामुळे अडथळे निर्माण झाले. परंतू प्रतिक्रिया तीव्र नव्हती. त्यामुळे आशा कायम आहे - अब्दुल बासित. 05:44PM - दोन्ही देशातील तस्करी, पाणी, पर्यावरणाचे मुद्दे सोडवले जाऊ शकतात - अब्दुल बासित 05:42PM - जागतिकीकरणाचा आशिया खंडातील देशांनी हवा तसा फायदा घेतला नाही - अब्दुल बासित 05:40PM - जम्मू काश्मीर समस्येचे मूळ असून शांतपणे विचार व्हावा. चर्चेने शांती प्रस्थापित होऊ शकते. पण चर्चा झाली की काश्मीर, दहशतवाद दूर होईल असे कुणी म्हणत नाही - अब्दुल बासित05:38PM - शक्तीचा उपयोग करून शांती प्रस्थापित होऊ शकत नाही, युद्धामुळे नव्या समस्या निर्माण होतात - अब्दुल बासित 05:37PM - भारत आणि पाकमध्ये 2 -3 गोष्टींवर विचार व्हावा. शांतीमुळे दोन्ही देशातीलल जनतेचा फायदा - अब्दुल बासित05:36PM - चीन,अमेरिकेकडून अपेक्षा.पण अफगाणिस्तान परत गृहयुद्धकडे जाण्याची भिती - अब्दुल बासित05:33PM - भारतासोबत संबंध सुधारावे यासाठी प्रतीक्षा करू शकतो,पण अफगानिस्तानची समस्या दूर करण्यावर भर आहे - अब्दुल बासित 05:32PM - आमच्याकडे सोने,गॅस,दूध मुबलक आहे. पण जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आम्ही प्रगती करू शकत नाही - अब्दुल बासित 05:31PM - 1979 नंतर अफगाणिस्तान मुळे पाकने खूप काही गमावले. आमच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. आमच्यावर टीका होते. पण सोव्हिएत युनियनने अफगाणवर हल्ला केला - अब्दुल बासित 05:29PM - दोन्ही देशात चांगले संबंध करत असताना राजदूतांची मौलिक भूमिका. हेच आमचे मिशन - अब्दुल बासित 05:27PM - भारत - पाक संबंध तुटता तुटत नाही आणि सोबत राहत पण नाही - अब्दुल बासित 05:25PM - नागपूरला प्रथमच पाक उच्चयुक्त आले आहेत. त्यामुळे सर्व कटुता दूर व्हावी - अब्दुल बासित 05:22PM - प्रसारमाध्यमांचे देखील आदानप्रदान होणे गरजेचे आहे. देश नव्या प्रगतीकडे जात आहे. इतिहासाला दूर सारून नवी सुरुवात करावी - प्रियांका चतुर्वेदी 05:18PM - चर्चेचे महत्व आहेच, पण जनतेचा संबंध वाढण्याची गरज आहे. हिंदी सिनेमा , संस्कृती यांचा संबंध सुधारणयासाठी उपयोग व्हावा. तसेच, सैन्यातदेखील चर्चा व्हायला हवी - प्रियांका चतुर्वेदी 05:15PM - दोन्ही देशांनी चर्चेला जाण्याची गरज आहे - प्रियांका चतुर्वेदी 05:02PM - भारतासमोर नेमके कोणाशी बोलावे हा प्रश्न उपस्थित होतो, पाकमध्ये अस्थिर व्यवस्था आहे, दोन्ही देशात व्यापारी संबंध वाढावे - -शेषाद्री चारी 05:00PM - दोन्ही देशात चर्चा व्हावी यासाठी जवळपास सर्वच पंतप्रधानांनी प्रयत्न केले. वाजपेयी पाकमध्ये प्रसिद्ध होते. एक पत्रकर म्हणाला होता कि ते पाकमधून पण निवडणूक जिंकू शकले असते. पण पाकमधील काही शक्तींना वाटते की चर्चा व्हायला नको - शेषाद्री चारी04:57PM - इस्लामाबादमध्ये मला खूप छान अनुभव आला, कपडे विक्रेत्याने मला दिल्लीतून कपडे विकत घेण्याचा सल्ला दिला. लोक मनाने जुळले आहेत - शेषाद्री चारी04:56PM - फाळणी गांधीजींना पण मंजूर नव्हती, नेहरू,पटेल यांनी पण विरोध केला होता - शेषाद्री चारी 04:55PM - प्राण्यांना सीमेचे बंधन नसते, 1947 मध्ये आजचे 70 टक्के लोक नव्हते, दोन्ही देशातील तरुणांना प्रगतीची अपेक्षा - शेषाद्री चारी 04:51PM - दोन्ही देशातील तरुणांनी विकास हवा आहे - शेषाद्री चारी 04:50PM- भारत पाकमध्ये कुठलीही भिंत नाही. ती मनुष्यनिर्मित आहे - शेषाद्री चारी 04:49PM- नागपुरात येणे सौभाग्याचे - शेषाद्री चारी 04:44PM - दोन्ही देशांनी व्हिसा संदर्भात विचार करावा, यासाठी जनतेने दबाव आणावा, तरुणांना इतिहासात नव्हे वर्तमानात रस - जतीन देसाई.04:43PM - पठाणकोट मुळे थांबली शांती चर्चा - जतीन देसाई. 04:42PM - भारत पाक चर्चा अनेकदा थांबते, यामुळे शांती हवी असलेल्यांचे नुकसान होते - जतीन देसाई.04:41PM - भारतामध्ये पाकिस्तानी पत्रकार काम करत नाहीत त्याचप्रमाणे पाकिस्तानी पत्रकार भारतात नाहीत याचं दुख:, लोकांना शेजारच्या राष्ट्रात काय चालू आहे याची माहिती हवी आहे - जतीन देसाई. 04:34PM - भारत आणि पाकिस्तान भांडणातून दोन्ही देशांचं खूप नुकसान झालं- देवेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक, लोकमत मीडिया प्रा. लि. 04:24PM - पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला केली सुरुवात. 04:22PM- पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित कार्यक्रमस्थळी उपस्थित 04:15PM - थायलंड, म्यानमार व अफगाणिस्तान येथील भारताचे माजी राजदूत विवेक काटजू, भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी व काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी कार्यक्रमस्थळी उपस्थित. पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित थोड्याच वेळात चर्चासत्रात होणार सहभागी..