Jagdamba! Chhatrapati Shivaji Maharah ‘Vagh-nakh’ to be brought back to India from UK
जगदंब! अफझल खानाचा कोथळा काढणारी शिवरायांची वाघनखे 'या' दिवशी महाराष्ट्रात येणार By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 6:45 PM1 / 10स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या मुघल दरबारातील अफझल खानाने महाराष्ट्रात धुडघूस घातला होता. गोरगरीब जनतेवर अत्याचार केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपवण्याचा विडा अफझल खानाने उचलला होता. 2 / 10इतिहासातील अफझल खानाचा वध आजही अंगावर शहारे आणणारा आहे. छत्रपती शिवराय यांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि स्वराज्याच्या याच मातीत त्याला गाडला. शिवाजी महाराज यांना आलिंगन घालून दगा करण्याच्या तयारीत असताना शिवरायांनी अफझल खानाला कायमचा संपवला. 3 / 10अफझल खानाने दगाफटका करण्यासाठी पाठीत खंजीर खुपसला, तेव्हा राजांनी चिलखत घातलेले होते. त्यांनी हाताच्या मुठीत पकडलेली वाघनखे काढली आणि अफझल खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा काढला. अफझल खानाचा स्वभाव शिवरायांना माहिती होता. 4 / 10अफझल खान वधातील छत्रपती शिवरायांनी वापरलेली ती वाघनखे आजही तशीच आहेत. इंग्रज राजवटीत ही वाघनखे इंग्लंडला नेण्यात आली. ब्रिटनच्या ताब्यात असलेली वाघनखे अखेर स्वराज्यात पुन्हा येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 5 / 10आदिलशाहीतील सेनापती अफझल खानाचा ज्या वाघनखांनी छत्रपतींनी वध केला ती सध्या लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवली आहेत. ही वाघनखे परत देण्यास ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून लवकरच याबाबत एक करार पार पडणार आहे. 6 / 10महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सचिव अधिकारी ऑक्टोबर महिन्यात ब्रिटनला जाणार आहेत. यावेळी सर्व आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यात येईल. २९ ते ४ ऑक्टोबर काळात हा दौरा आहे. मुख्यमंत्रीही या करारावेळी ब्रिटनमध्ये उपस्थित असणार आहेत. 7 / 10याबाबत मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. शिवरायांची वाघनखे ब्रिटनमध्ये आहे. ही वाघनखे परत आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आमचे प्रयत्न सुरू होते. त्याला आता यश मिळाले आहे. पहिला MOU करण्यासाठी आम्ही जात आहोत. 8 / 10त्याचसोबत या MOU मध्ये ब्रिटननं काही अटी घातल्या आहेत. त्यात ही वाघनखे राज्यभर फिरवू नये. ही वाघनखे एका ठिकाणी सुरक्षित ठेवावी, या वाघनखाला सुरक्षा करावी. या सुरक्षेबाबतच आम्ही चर्चा करण्यासाठी ब्रिटनमध्ये चाललो आहे असं मुनगंटीवार म्हणाले. 9 / 10दरम्यान, नोव्हेंबरमध्ये शिवप्रताप दिनी ही वाघनखे महाराष्ट्रात येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. जेव्हा वाघनखे परत येतील तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह इतर सहकारी आम्ही त्याच्या स्वागतासाठी जाणार आहोत अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 10 / 10तसेच आम्ही हादेखील प्रयत्न करतोय, त्यात किती यश येईल माहिती नाही. ब्रिटनचे पंतप्रधानांनी एक दिवसासाठी यावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना याच महाराष्ट्राच्या भूमीत ती वाघनखे सुपूर्द करावीत. यासाठी आम्ही ब्रिटनच्या पंतप्रधानांनी वेळ मागितली आहे असंही मुनगंटीवार बोलले. आणखी वाचा Subscribe to Notifications