शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maharashtra Political Crisis: एकाच कुटुंबात दोन गट! आमदार भाऊ शिंदे समर्थक, तर बहीण ठाकरेंशी एकनिष्ठ; दिले स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 9:10 AM

1 / 9
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर पक्ष वाचविण्याचे नवे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
2 / 9
राज्यभरातून शिंदे गटाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील मैदानात उतरले असून, ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याचा दौरा करून शिवसेनेत पुन्हा एकदा नवचैतन्य भरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
3 / 9
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत बंडखोरी आणि एकंदर परिस्थितीवर रोखठोक भाष्य करत महाराष्ट्र शिवसेनामय करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. ऑगस्ट महिन्यात खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत.
4 / 9
तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील निष्ठा यात्रेनंतर आता शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून युवासैनिक आणि शिवसैनिकांची मोट पुन्हा बांधण्यासाठी झंझावती दौरे सुरू केले आहेत. असे असले तरी शिंदे गटाला वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे.
5 / 9
यातच आता शिवसेनेसोबत बंडखोरी करीत आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले
6 / 9
गेली ३० वर्षे त्यांचे वडील हे शिवसेनेत सक्रिय राहिले आहेत. त्यांनी नेहमीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार किशोर पाटील हेदेखील नेहमी त्यांना शुभेच्छा देतात. यंदा मात्र ते शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे यांना शुभेच्या देण्यात खंड पडणार असल्याचे लक्षात आल्यावर आपण पाचोरा शहरात फलक लावून त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे.
7 / 9
वैशाली सूर्यवंशी यांनी वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या असून, ही शुभेच्छा फलक पाचोरा शहरात ठिकठिकाणी झळकली असल्याची पाहायला मिळत आहे. यामुळे आमदार किशोर पाटील यांना पाठिंबा न देता बहिणीने उद्धव ठाकरे यांना समर्थन दिल्याचे पाहायला मिळत आहे.
8 / 9
एकाच कुटुंबातील असलेल्या वैशाली सूर्यवंशी या बहिणीने भाऊ आमदार किशोर पाटील यांना पाठिंबा न दर्शवता उद्धव ठाकरे यांना समर्थन देत वेगळी वाट निवडल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आली आहे.
9 / 9
वैशाली सूर्यवंशी यांनी अचानक राजकीय बॅनर बाजी केली. तसेच पक्षाने संधी दिल्यास सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत सुद्धा दिल्याने आगामी काळात आमदार किशोर पाटील आणि बहिण वैशाली पाटील यांच्यात पाचोऱ्यात सामना रंगण्याची चिन्हे असल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना