Janata Curfew On Sunday to curb coronavirus What Is Closed And What Is Open kkg
Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 10:19 PM1 / 10कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. लोकांनी घराबाहेर पडणं टाळावं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा, असं मोदींनी म्हटलं. त्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरातल्या बऱ्याचशा सेवा बंद राहणार आहेत.2 / 10जनता कर्फ्यू दरम्यान मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, दुकानं बंद राहतील. मात्र औषधांची दुकानं सुरू राहतील.3 / 10शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी १० पर्यंत कोणतीही पॅसेंजर ट्रेन चालवण्यात येणार नाही. रविवारी पहाटे ४ पासून मेल/एक्स्प्रेस ट्रेनदेखील बंद होतील. रविवारी रात्री १० पासून सर्व इंटरसिटी ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ७०० हून अधिक लांब पल्ल्यांच्या गाड्या आधीच रद्द करण्यात आल्या आहेत. 4 / 10मेट्रो, मोनो- मुंबईतील मेट्रो आणि मोनो रेल्वे सेवा उद्या बंद असेल.5 / 10बेस्ट- उद्या मुंबईतील बेस्ट बस सेवा सुरू होईल. मात्र रविवार असल्यानं बसेसची संख्या कमी असेल.6 / 10रिक्षा, टॅक्सी- उद्या मुंबईतील ५ ते १० टक्के रिक्षा, टॅक्सी सुरू असतील. मात्र शेअर रिक्षा, टॅक्सी बंद असतील.7 / 10एसटी- राज्यातील एसटीची सेवा उद्या सुरू असेल. मात्र राज्याबाहेर जाणाऱ्या एसटी बसेस बंद असतीस. आगारातून किती बसेस सोडायच्या याचा निर्णय प्रवासी संख्या बघून आगार व्यवस्थापक घेतील.8 / 10लोकल- मुंबईतील लोकलच्या ४० टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्ये रेल्वेच्या ६६८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून पश्चिम रेल्वेच्या ४७७ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 9 / 10 विमान सेवा- बहुतांश विमान कंपन्यांनी उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. गो एअर, इंडिगो, एअर विस्तारा यांनी उद्याची उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.10 / 10ओला, उबर- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शेअरचा पर्याय ओला, उबरनं रद्द केलाय. मात्र इतर सेवा सुरू आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications