Jayanti Kathale, Urmila Nimbalkar, Amruta Khanvilkar bags Lokmat Sakhi dot com Awards
जयंती कठाळे, ऊर्मिला निंबाळकर, अमृता खानविलकर, वैशालीताई विलासराव देशमुख... LokmatSakhi.com तर्फे यशस्विनींचा सन्मान By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 5:44 PM1 / 20चाकोरी मोडणाऱ्या आणि आपण निवडलेल्या नव्या वाटेवर प्रचंड आत्मविश्वासाने वाटचाल करत यशाचं शिखर गाठलेल्या विविध क्षेत्रातील १९ कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान 'लोकमत सखी डॉट कॉम अवॉर्ड्स' सोहळ्यात करण्यात आला. पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात बँकर ते सिंगर असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अमृता फडणवीस, मराठी सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा आणि ग्रॅव्हिटास फाउंडेशनच्या संचालक आणि प्रथितयश उद्योजिका उषा काकडे यांनी यशस्विनींचा गौरव केला. पाहूया या कर्तबगार महिलांची यशोगाथा...2 / 20आपली आजी म्हणजेच सुमन धामणे. हातात कला आणि सोबत तंत्रज्ञान असेल तर काय जादू होऊ शकते, आजीला विचारा.वय किती, ग्रामीण भागात राहतो की शहरात हे सब झूठ ठरते. आजी स्वयंपाक तर चमचमीत करतच पण एकदा नातवानं हट्ट केला की रेसिपीचा व्हिडिओ करुन यूट्यूबवर टाकू म्हणून, आजीनं आपल्या गावरान ठसक्यात व्हिडिओ केला. म्हणता म्हणता व्हिडिओ गाजले आणि आधी फक्त यशची आजी असलेली आपली आजी युट्यूबरच नाही तर बिझनेस वूमन झाली. युट्यूबर आपली आजी, तिच्या रेसिपी, मसाले आज सारंच लोकप्रिय आहे.3 / 20१३ वर्षे आयटीत नोकरी केल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण मराठी पदार्थांचं हॉटेल का काढू नये? आणि ते बंगळुरुत? आणि तिथून सुरुवात झाली एका 'पूर्णब्रह्म' स्वप्नाची. आज भारतभरात त्यांच्या 'पूर्णब्रह्म' हॉटेलच्या १४ शाखा आहेत तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही त्यांच्या शाखा आहेत. पूर्णब्रह्म या मराठमोळ्या हॉटेल साखळीच्या संस्थापक व्यवस्थापकीय संचालक जयंती कठाळे. मराठी पदार्थ जगभरात नावारुपाला आणण्याचं मोठं चविष्ट काम त्या करत आहेत.4 / 20उर्मिला नाव एक पण तिची रुपं अनेक. यूट्यूबर, अभिनेत्री आणि व्हाइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून ती लोकप्रिय आहे. हिंदी मालिका, मराठी चित्रपट आणि मालिकांत काम करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या उर्मिलाने स्वत:चा युट्यूब चॅनल सुरु केले. फॅशन, लाइफस्टाइल आणि मेकअप विषयातली मराठीतली सर्वात मोठी यूट्यूबर अशी तिची आज ओळख आहे. अनेक इंटरनॅशनल मेकअप ब्रॅंडसोबत काम करणारी पहिली मराठी एन्फ्लूएन्सर तर ती आहच तिनं नुकतीच स्वतःची डीजीटल कन्टेट क्रिएशन कंपनीही सुरु केली आहे. उत्तम व्हाइस ओव्हर आर्टिस्ट असल्याने व्हॅाइस ऑफ इंडिया हा व्हाइस ओव्हरसाठीचा नामांकित पुरस्कारही तिला मिळाला आहे.5 / 20वय वर्षे फक्त २३. मात्र आज श्रद्धा एक यशस्वी ॲग्रीकल्चर आंत्रप्रिनर आहे. श्रद्धाने भौतिकशास्त्रात एमएससी केलं त्यानंतर निघोज गावात अक्षरश: शून्यातून आपला व्यवसाय सुरु केला. आज तिचा स्वत:चा ८० म्हशींचा गोठा आणि काही लाखांची उलाढाल आहे. डेअरी व्यवसायाचे प्रशिक्षण ती तरुण शेतकऱ्यांना देते आहे. हे सारं करत असताना श्रद्धानं आपली ट्रेकिंगची आवडही जोपासली आहे आणि फिटनेसच्या संदर्भात तर तिचा फेवरिट अक्षय कुमार तिचा आदर्श आहे. 6 / 20वैशालीताई म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्त्व. त्या स्वत: मातीत रमतात, शेतीत त्यांना विशेष रस आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, दै. एकमतच्या विश्वस्त अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं काम सुरु असतं. शेतीसह, उसतोड कामगार महिलांचे प्रश्न, त्यांचे कष्ट यांची त्यांना जाण आहे आणि त्यांचं जगणं सुकर व्हावं म्हणून त्या कळकळीने काम करतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी, अमित -रितेश- धीरज देशमुख या यशस्वी पुत्रांच्या मातोश्री आणि आता नातवंडांच्या प्रेमळ आजी, आपल्या सर्व भूमिका पार पाडत समाजासाठी सदैव कार्यरत असतात वैशालीतताई देशमुख.7 / 20कॉमेडीचं अचूक टायमिंग म्हणजे श्रेया बुगडे. विनोदाचं जग पुरुषप्रधान दिसत असलं तरी श्रेयानं त्या जगात आपली स्वतंत्र आणि ठाम छाप उमटवली आहे. आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात श्रेयाच्या अभिनयासह कॉमेडीच्या परफेक्शनची पकड बेमिसाल आहे. मुळची पूणेकर श्रेया, बालनाट्यातून सुरुवात करत आज विनोदाची जादूगर अभिनेत्री म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. विनोदाची तिची स्वतंत्र शैली निव्वळ लाजबाब.8 / 20फॅशन डिझायनर म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या 'वैशाली एस' या ब्रॅण्डच्या संस्थापक वैशाली शडांगुळे. मध्यप्रदेशातल्या विदिशा या छोट्या गावातली, फॅशनच्या जगापासून प्रचंड दूर असलेली ही तरुणी आज आंतरराष्ट्रीय फॅशनच्या जगातलं एक अत्यंत मोठं आणि प्रतिष्ठित नाव आहे. पारटेक पॅरिस फॅशन शोमध्ये सहभाग नोंदवणारी ती दुसरी भारतीय आणि पहिली महिला भारतीय फॅशन डिझायनर आहे. मिलान फॅशन वीकमध्ये आंमत्रित एकमेव भारतीय महिला. स्मॉल टाऊन गर्ल ते इंटरनॅशनल फॅशन रॅम्प हा वैशालीचा प्रवास एकच सांगतो, स्वप्न पाहा ती नक्की पूर्ण होतात.9 / 20महाराष्ट्रातील तरुण आणि आश्वसक राजकीय नेत्या आणि आमदार आदिती तटकरे. श्रीवर्धन विधानसभर मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत. उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या विभागांच्या त्या राज्यमंत्रीही होत्या. जिल्हा परिषदेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारर्किदीला सुरुवात केली त्यामुळे ग्रामीण प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. तरुण आश्वासक नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची वाटचाल सुरु आहे.10 / 20हजारो किलोमीटर विशाखा एकटी फिरते, ते ही बाईक चालवत. भारतातल्या व्हायरल रायडर्स , कंटेट क्रिएटर्सच्या यादीत तिचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. कॉलेजात शिकत असताना विशाखाला बाइक रायडिंगचा नाद लागला आणि मग तेच तिचं पॅशन झालं. विशाखा भारतातील पहिली फिमेल मोटो व्ह्लोगर आहे. रायडर गर्ल विशाखाचे युट्यूबवर १.५ मिलिअन तर इन्स्टाग्रामवर आणि इंस्टाग्रामवर ६ लाख फॉलोअर्स आहेत. लेह लडाख ते अंदमान निकोबार फिरणाऱ्या विशाखाने इंडिया बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पाचवेळा आपला विक्रम नोंदवला आहे.11 / 20आपण अभिनेत्री व्हायचं हे स्वप्न अथक मेहनतीने सत्यात उतरवणारी एक गुणी चंद्रमूखी अभिनेत्री. अमृताचं नृत्यातलं कसब तर कमाल आहेच मात्र कट्यार काळजात घुसली, राजी आणि चंद्रमूखीसारख्या सिनेमातून तिनं आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप उमटवली आहे. नच बलिए, झलक दिखला, खतरों के खिलाडी हे हिंदीतले लोकप्रिय रिॲलिटी शो तिनं गाजवले आणि मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या गुणवत्तेची ठळक मोहोर उमटवली. मराठीसह हिंदीतही आपली खास ओळख निर्माण करणारी अमृता खानविलकर.12 / 20शुटिंग आणि कोल्हापूरची राही सरनोबत हे दोन समानार्थी शब्द वाटावेत इतकी राहीची शुटिंग तपश्चर्या मोठी आहे. २५ मीटर पिस्तूल नेमबाजीत राहीने आजवर कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहे. पहिलं कॉमनवेल्थ पदक तिनं २००८ मध्ये जिंकलं आणि तिथपासून आजवर तिची नेमबाजी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करते आहे. राहीला मानाचा अर्जून पुरस्कारही मिळाला आहे.13 / 20तेजस्विनी पंडित. तिच्या कारकिर्दीमध्ये एकीकडे गुलाबाच्या कळीसारखी मोहक अदा दिसते तिथेच दुसरीकडे सिंधुताई सपकाळ यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलेली भूमिकादेखील दिसते. मराठी मध्ये सर्वाधिक गाजलेल्या समांतर, समांतर भाग 2, रानबाजार, अनुराधा या OTT सिरीज मधल्या तिच्या दमदार भूमिका गाजल्या. त्यासोबतच तिने मराठी मध्ये सर्वाधिक पाहिली गेलेली periodic वेब सीरिज 'अथांग'ची उत्तम निर्मिती देखील केली. नुकतीच तिने तरुणाईसाठी खास बांबू सिनेमाची निर्मिती करून चित्रपट निर्मितीमध्ये देखील दमदार entry केली आहे.14 / 20२०१० बॅचच्या आयपीएस. सध्या SRPF ग्रूप फाइव्ह दौंड येथे कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. विनिता साहू म्हणजे कामाचा धडाका आणि कल्पकता, साहस यांचा अनोखा मिलाफ आहे. यापूर्वी ॲडिशन SP म्हणून त्यांनी सिंधूदूर्ग, एसपी म्हणून वाशिम, भंडारा, आणि डीसीपी म्हणून नागपूर येथे उत्तम काम केले आहे. त्यासाबेतच नक्षलग्रस्त गोंदिया येथे पहिल्या महिला SP म्हणून काम करण्याचा बहूमान त्यांचाच. मोबाइल पोलीस स्टेशन ही त्यांची पोलीस स्टेशनच नागरिकांच्या दारी घेऊन जाण्याची कल्पना गाजली आणि सरकारने ती स्वीकारत राज्यभर राबवली. भंडाऱ्यात वाळू माफियांना अद्दल घडवत आजवर अनेक साहसी ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. मात्र कोरोनाकाळात स्थलांतरीत मजूरांना आसरा आणि भोजन ते आरोग्यसेवा पुरवण्यापर्यंत त्यांनी केलेले काम हे प्रशासनातील माणुसकीचे उत्तम उदाहरण आहे.15 / 20पवित्र रिश्ता या एकता कपूरच्या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली गुणी अभिनेत्री प्रार्थना बेहरे, म्हणता म्हणता प्रेक्षकांची आवडती ‘मितवा’ बनत, माझी तुझी रेशीमगाठची गोष्ट सांगत अतिशय लोकप्रिय झाली. मुळची बडोद्याची प्रार्थना, तिच्या मराठी सिनेमा प्रवासाची सुरुवात 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' सिनेमातून झाली. त्यानंतर 'कॉफी आणि बरंच काही', 'मितवा', 'मिस्टर ॲण्ड मिसेस सदाचारी' या सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारल्या. तिचा सालस, सोज्वळ अभिनय आज मराठी प्राइम टाइमची लोकप्रिय गोष्ट आहे.16 / 20लीना मोगरे हे फिटनेसच्या जगातलं अत्यंत ख्यातनाम नाव. भारतातल्या पहिल्या महिला पर्सनल फिटनेस एक्सपर्ट अशी त्यांची ओळख आहे. आजवर माधुरी दीक्षित, जाॅन अब्राहम, बिपाशा बसू, ते कतरिना कैफ, ते हरमनप्रीत कौर यांच्या फिटनेस आणि न्यूट्रिशन मार्गदर्शक म्हणून काम केलं आहे. एका नामांकित आंतरराष्ट्रीय जीमच्या साखळीची भारतातली पहिली सीईओ अशीही त्यांची ओळख आहे. लीना मोगरेज फिटनेस हा त्यांचा सिग्नेचर ब्रॅण्ड. ज्याच्या देशभर अनेक शाखा आहेत. टोटल फिटनेस-लीना मोगरे वे हे त्यांचे गाजलेले पुस्तक. फिटनेस एक्सपर्ट म्हणून त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 17 / 20मूळच्या औरंगाबादच्या असलेल्या ॲड कोमल. वयाच्या केवळ पंचविशित इंग्लंडडून सॉलिसिटरची पदवी घेणाऱ्या त्या मराठवाड्यातील पहिल्याच महिला ॲडव्होकेट आणि सॉलिसिटर आहेत. सिव्हिल आणि क्रिमिनल अशी दोन्ही प्रकारची प्रॅक्टिस त्या करतात. त्यांच्या कामाचा स्पेकट्रम अत्यंत व्यापक आहे. विशेष म्हणजे ॲड. कोमल यांच्या नावावर आजवर अनेक पथदर्शी निकाल जमा आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातले त्यांच्या खटल्याचे निर्णय गाजलेले आहेत. महिला आणि लहान मुलं यांच्यासंदर्भातले कायदे यासंदर्भातही त्या अत्यंत मुलभूत काम करतात. आपलं कुटूंब आपली ताकद आहे असं त्या अत्यंत मायेनं सांगतात. 18 / 20क्लिक टू क्लाऊड या कंपनीच्या बिझनेस हेड रुपल शिरपूरकर. मुळच्या नागपूरच्या असलेल्या रुपल इंजिनिअर आहेत. त्यांची कंपनी जगातल्या मातब्बर मायक्रोसॉफ्ट, सॉफ्टबँक, अलिबाबा क्लाऊड, लिनक्स फाउंडेशन यांच्यासह २२ देशांमध्ये जागतिक व्यावसायिक संबंधांचे नेतृत्व करत आहे. तंत्रज्ञानावर अत्यंत प्रेम असणाऱ्या रुपल स्वत: क्लाऊड असेसमेण्ट आणि क्लाऊड मॅनेजमेण्ट सोल्यूशनमधल्या एक्सपर्ट आहेत आणि ओपन सोर्स कम्युनिटिज निर्माण करणं ही त्यांची पॅशन आहे. महाराष्ट्राची मून गर्ल अशी त्यांची ओळख आहे त्यांनी चीनच्या कृत्रिम चंद्र निर्मिती प्रकल्पात योगदान दिले आहे. 12 Women in Cloud across globe – 2022, 8 Women Trailblazers In The World Of Cloud Computing In India यासारख्या प्रतिष्ठित यादीत त्यांची निवड झाली आहे.19 / 20गेली १५ वर्षे मराठी प्रेक्षकांत लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. तिचे नृत्य कौशल्य अफाट आहे, वाट बघतोय रिक्षावाला हे गाणं सर्वदूर लोकप्रिय झलं आणि मानसी नाईकची ओळख महाराष्ट्राला झाली. मानसीने एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, कोकणस्थ यांसारख्या अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. तिची गाणी सर्वदूर सर्वांना ठेका धरायला लावतात इतकी लोकप्रिय आहेत.20 / 20गेली १५ वर्षे मराठी प्रेक्षकांत लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. तिचे नृत्य कौशल्य अफाट आहे, वाट बघतोय रिक्षावाला हे गाणं सर्वदूर लोकप्रिय झलं आणि मानसी नाईकची ओळख महाराष्ट्राला झाली. मानसीने एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, कोकणस्थ यांसारख्या अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. तिची गाणी सर्वदूर सर्वांना ठेका धरायला लावतात इतकी लोकप्रिय आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications