शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कास पठार फुलांनी बहरले, पण कोरोनामुळे पर्यटन कोमेजले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 4:50 AM

1 / 11
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटनस्थळे बंदच ठेवण्यात आली आहेत. पण निसर्गाला कोण रोखणार. निसर्ग आपला चमत्कार दाखवतच असते. जागतिक दर्जाच्या कास पठारावर विविध रंगाची फुले फुलण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यावर्षी पर्यटकांशिवाय ती कोमेजूनही जाण्याची शक्यता आहे.
2 / 11
सह्याद्रीच्या रांगांत अनेक महत्त्वाच्या भागात सप्टेंबरच्या आसपास ही वनस्पती उगवते. हिला तेरडा किंवा गौरीची फुले म्हणतात. जास्त उंच न वाढणारा जांभळा तेरडा. या फुलाने पठार व इतर सडे उठून दिसते.
3 / 11
जमिनीत असणाऱ्या कंदापासून ही वनस्पती उगवते. गोल बटाट्यासारखा कंद असून, त्यातून कोंब बाहेर येऊन षटकोनी आकाराची फांदी मोठी होत जाते.
4 / 11
(हबनारिया हायनायना ) ही कंदवर्गीय वनस्पती असून टूथब्रशसारखी फुले पाहायला मिळतात.
5 / 11
सोनकी नावाची वनस्पती ही सोन्यासारखी आहे. सोनकी, सोनकडी, शेनकडी या अनेक नावाने ही ओळखली जाते. जुलै महिन्यातील ही सोनकी लोकांना, पक्ष्यांना आकर्षित करते.
6 / 11
(पानभोपळी) नायफांडिस इंडिका ही वनस्पती कास पठारावरील महाबळेश्वर राजमार्गावर असणाºया तलावात आढळून येते. म्हणून या तलावाला कुमुदिनी तळे नाव पडले.
7 / 11
ही गवत वर्गीय वनस्पती आहे. याची पाने व देठ जाडसर असतो. त्यावर सप्टेंबरच्या आसपास आभाळी रंगांचे कप्या-कप्याची फुले येत असल्याचे दिसतात
8 / 11
गवेली
9 / 11
अबोलिमा
10 / 11
चवर
11 / 11
फुलांच्या हंगामाप्रमाणे फुले ही येतच राहणार. गेल्या काही दिवसांत धुके व पाऊस असल्यामुळे फुले येण्याचा हंगाम्ां थोडा मागे पुढे होऊ शकतो. थोडे ऊन (उष्णता) पडले की फुलांचा बहर चांगला येणार. - श्रीरंग शिंदे, वनपाल
टॅग्स :Kas Patharकास पठारSatara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्रtourismपर्यटनNatureनिसर्ग