Know about the currency in the times of Shivaji Maharaj era
शिवरायांच्या काळातील चलनाबद्दल जाणून घ्या या ५ गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 3:04 PM1 / 6छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर स्थापन केलेल्या स्वराज्यात चलन म्हणून वापरलं जाणारं नाणं ‘शिवराई' म्हणून ओळखलं जायचं. महाराजांच्या काळात टांकसाळीत बनवल्या जाणाऱ्या सुमारे ५०० व नंतरच्या राजवटीत वापरल्या गेलेल्या अडीच हजार शिवराईंचा समावेश होतो. 2 / 6रायगडावर राजांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेल्या शिवराई प्रमाणबद्ध असून दोन्ही बाजूंना बिंदुयुक्त होत्या. रायगडावरील टांकसाळीतून तयार झालेली नाणी ज्या दरवाजातून घेऊन जात त्याला ‘नाणे दरवाजा' असे म्हणत. 3 / 6सन १६६४ मध्ये शिवरायांनी शिवराई चलनात आणली पण राज्याभिषेकापूर्वीच्या आणि १६७४ मध्ये राज्याभिषेकानंतरच्या शिवराईंमध्ये फरक आढळतो. नंतरच्या शिवराई अत्यंत सुबक आणि बिंदुमय दिसून येतात. तसंच तत्कालीन काही नाण्यांच्या दुसऱ्या बाजूला राजमुद्रा छापलेली दिसून येते. 4 / 6शिवाजी महाराजांची शिवराई - शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकादिवशी विशिष्ट प्रकारची नाणी बनवण्यात आली. काही नाणी सोन्याची होती म्हणून त्यांना ' शिवराई होन' असं म्हणतात. या नाण्यावर उलट अक्षरात देवनागरी लिपित 'शिवाजी महाराज' असं लिहिलं होतं. 5 / 6दुदांडी शिवराई - नाण्याच्या अगदी वरच्या टोकाला अधोरेखित केलेलं 'श्री' व त्याखालोखाल उलट शब्दात लिहिलेलं 'राजा' म्हणून या नाण्यांना दुदांडी म्हणत असत.6 / 6'EIC's शिवराई - ब्रिटिशांच्या 'इस्ट इडिंया कंपनी'ने त्यांच्या टांकसाळीत बनवलेल्या शिवराईंना 'EIS's शिवराई म्हणतात. या नाण्यावर फारसी भाषेत 'छत्रपती' व 'राजा' असे दोन शब्द लिहिलेले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications