शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा; २१०० रुपये कधी जमा होऊ शकतात? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 12:41 PM

1 / 7
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. खात्यात दीड हजार रुपये की २१०० रुपये जमा होणार याची चर्चा लाडक्या बहिणीत रंगली आहे.
2 / 7
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या बहुतांशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
3 / 7
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला व दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला.
4 / 7
नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत.
5 / 7
दरम्यान, आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणुका आटोपल्या असून लाडक्या बहिणीच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याचे प्रतीक्षा बहिणींना आहे.
6 / 7
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते .आता महायुतीचे सरकार आल्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार का अशीही चर्चा लाडक्या बहिणी मध्ये सुरू आहे.
7 / 7
डिसेंबरचा हप्ता दिल्यास तो दीड हजार रुपये प्रमाणे दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे २१०० रुपयांच्या हप्त्यासाठी लाडक्या बहि‍णींना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाState Governmentराज्य सरकारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४WomenमहिलाEknath Shindeएकनाथ शिंदे