शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कार्तिक आर्यन, संजीव बजाज, देवेन भारती...'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे सर्व मानकरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 21:54 IST

1 / 17
LMOTY 2025: महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा म्हणून 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्याकडे पाहिले जाते. हा पुरस्कार सोहळा आज (19 मार्च 2025) मुंबईतील राजभवनात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट-अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक आजी-माजी नेते उपस्थित होते.
2 / 17
अभिनेता कार्तिक आर्यनने २०११ साली 'प्यार का पंचनामा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका केल्या आहेत. त्याने अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अभिनय क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्सने कार्तिक आर्यनला सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राजभवनात पार पडला.
3 / 17
संजीव बजाज यांनाही महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. संजीव बजाज, हे बजाज समुहाचे प्रमुख दिवंगत राहुल बजाज यांचे पुत्र आणि बजाज फिनसर्व कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संजीव बजाज यांनी आयोजकांचे आभार मानले.
4 / 17
मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनाही यंदाचा लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या भारती यांनी आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली आहेत. मुंबईवरील 26/11 हल्ला असो, पत्रकार जेडी हत्याकांड असो किंवा दहशतवादी नेटवर्क उद्धवस्त करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
5 / 17
यावेळी BAPS स्वामीनारायण संस्थेचे ब्रह्मविहारी दास यांचाही लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
6 / 17
यजुर्वेद्र महाजन (दीपस्तंभफाउंडेशन - जळगाव)- सोळा वर्षावरील सर्व प्रकारच्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिले निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रज्ञान प्रशिक्षण देणारा प्रकल्प जळगाव, पुणे येथे सुरू केला. - भारतातील १८ राज्यांतील ५०० विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. - २००६ पासून राज्यातील हजारो आदिवासी, ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले. - त्यातील १२०० हून अधिक विद्यार्थी प्रशासनात विविध पदांवर कार्यरत आहेत. - देशातील पहिल्या इन्क्लुझिव्ह व अॅक्सेसिबल प्रकल्पाची जळगाव येथे लोकसहभागातून निर्मिती केली.
7 / 17
संदीप पवार (जिल्हा परिषद शाळा)- बीड जिल्ह्यातील जरेवाडी येथील ऊसतोड मजुरांचे स्थलांतर. १९९५ पर्यंत जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत एक शिक्षक शाळेची पटसंख्या केवळ २४ होती. शाळेचा कायापालट करून २५ वर्गखोल्या असून २० शिक्षक आणि ८०० विद्यार्थी आहेत. जरेवाडीतील ५० मुले आणि ७५० मुले अन्य खेडेगावातील आहेत. १० वर्षात ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. विद्यार्थ्यांचे स्थलांतर शून्य टक्के आणले. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत बीड जिल्ह्यात शाळा प्रथम आणि विभागात तृतीय येऊन ११ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले. आय.एस.ओ. मानांकन मिळविणारी बीड जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे.
8 / 17
चिराग शेट्टी (बॅडमिंटन, मुंबई) - (जन्म : ४ जुलै १९९७). जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक (२०२२), थॉमस चषक सुवर्ण (२०२२). राष्ट्रकुल सुवर्ण (२०१८, २०२२), आशियाई सुवर्ण (२०२२) आशियाई अजिंक्यपद सुवर्ण (२०२३). अर्जुन पुरस्कार (२०२०), मेजर ध्यानचंद खेलरत्न (२०२३). २०२४ मधील कामगिरी:- मलेशिया ओपन दुहेरी उपविजेतेपद, इंडिया ओपन दुहेरी उपविजेतेपद. - फ्रेंच ओपन पुरुष दुहेरी जेतेपद. - ११ ते १६ मार्चदरम्यान ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेसह डिसेंबरमध्ये वर्ल्ड टूर फायनल्समध्ये जेतेपदाची अपेक्षा. - पुढील ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा.
9 / 17
डॉ. सचिन खत्री (डेंटिस्ट - शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर)- विभागप्रमुख, सामाजिक देतशास्त्र विभाग येथे कार्यरत. गडचिरोलीत २३ हजार मुलांच्या मुखाची तपासणी केली, यामधील ३ हजार ४८७ (१५ टक्के) मुलांमध्ये मुख पूर्व कर्करोगाची लक्षणे दिसून आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार.- ८१२ मुलांवर शस्त्रक्रिया तर २ हजार ६०० विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले. तंबाखू व्यसनाबाबत जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांना प्रबोधन केले आहे. - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये 'जागतिक मौखिक आरोग्य दिन उत्सव'साठी पहिले आणि जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्सवसाठी पहिल्या पारितोषिकाने सन्मानित. - आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 'ब्लॉसम' उपक्रमांतर्गत विदर्भातील ८ हजार आदिवासींचा अभ्यास करण्यात आला, त्यामध्ये संशोधक म्हणून काम पाहिले.
10 / 17
शिवाजीराव डोळे (अजंग-जि. नाशिक)- निवृत्त जवान आणि शेतकऱ्यांना एकत्र आणून सहकारी तत्त्वावर व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह अॅग्रो कंपनीची स्थापना केली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अजंग येथे ५२८ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचा प्रयोग. संस्थेचे एक लाख १२ हजार सभासद. - विषमुक्त शेतीवर भर. कृषी उत्पादने युरोपमध्ये निर्यात. रोजगार निर्मितीत यश. - शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर खते, बियाणे उपलब्ध करून दिली. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रयोगाचा 'मन की बात' मध्ये गौरवाने उल्लेख केला. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी जानेवारी महिन्यात या प्रकल्पाला भेट दिली.
11 / 17
डॉ. जुई मांडके (पेडियाट्रीक सर्जन -सूर्या हॉस्पिटल) - गेल्या २१ वर्षांपासून मुंबईतील प्रमुख रुग्णालयात त्या पेडियाट्रीक सर्जन बाल शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. -नवजात बाळावर, अगदी एक दिवसाच्या बाळापासून ते लहान मुलांवर लॅप्रोस्कोपीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करत आहेत. -विशेष म्हणजे रोबोटिकच्या साहाय्याने लहान मुलांच्या विविध आजरांवर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. -१० हजारांपेक्षा अधिक बालकांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. गर्भात असलेल्या व्यंगाची तपासणी करण्याकरिता फिटलस्कोपीचा वापर. -बालशल्यचिकित्सा संघटनेने बालशल्यचिकित्सावरील काढलेल्या पुस्तकात एक धडा लिहिला आहे. -वैद्यकीय शाखेतील विविध परिषदांमध्ये सहभाग, त्यासोबत संशोधन निबंध प्रसिद्ध.
12 / 17
उदय सामंत(उद्योगमंत्री, शिवसेना - शिंदे गट, रत्नागिरी)- १९९७ साली राजकारणात आले आणि १९९९ मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले.- रत्नागिरी विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस (२००४-२००९), शिवसेना (२०१४ - २०१९) आणि शिंदेसेना (२०२४) असे सलग ५ वेळा निवडून आले. - महाविकास आघाडी सत्तेत उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री झाले. - राज्यातील विद्यापीठांना भेटी देऊन महाविद्यालयांचे प्रश्न मार्गी लावले. - दावोस येथे उद्योगमंत्री म्हणून त्यांनी केलेले करार महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचे. - उद्योगमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पुन्हा दावोस येथे विक्रमी करार केले आहेत.
13 / 17
अदिती तटकरे(महिला व बालकल्याण मंत्री, राष्ट्रवादी -काँग्रेस अजित पवार गट, रायगड)- सलग दुसऱ्यांदा आमदार. २०१८ साली वरसे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी. जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून निवड. - मविआ सरकारमध्ये राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री. शिंदे-भाजप सरकारच्या काळात महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत मोठा सहभाग.- महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री असताना जिल्ह्याचे महत्त्वाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले.
14 / 17
डॉ. दीक्षित गेडाम (डीसीपी झोन ९, मुंबई) - गेल्या काही महिन्यांत मुंबईतील वांद्रे व परिसरात झालेल्या अनेक संवेदनशील प्रकरणांचा तपास केला. - सलमान खान गोळीबार प्रकरण. - बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरण. - सैफ अली खान हल्ला प्रकरण.- उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या हत्येचा अवघ्या काही तासांत उलगडा. - रणवीर, रैनाची चौकशी प्रकरण. - मुंबईत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या परिमंडळ ८ आणि आता ९ ची जबाबदारी ते सांभाळत आहेत.
15 / 17
शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका) -२०२४ मध्ये प्रशासकीय सेवा सुधारणांसाठी राज्य सरकारने सन्मानित केले. माझी वसुंधरा अभियानात महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाच्या कालखंडामध्ये नवनव्या योजनांना प्राधान्य दिले. - प्रशासकीय सुधारणा, आरोग्य, शिक्षण यामधील कार्यामुळे २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे गौखण्यात आले. - माझी वसुंधरा अभियानांतर्गत ५ जून २०२१ रोजी उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान. - २०२२ मध्ये साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी असताना पोषण अभियान आणि स्किल डेव्हलपमेंट स्कीम अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.
16 / 17
आसा सिंह (अध्यक्ष, रेडियंट इंडस केम प्रा. लि., मिसेस फूडराइट)- कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या- ५०० पेक्षा अधिक. कंपनीची अंदाजित उलाढाल -२५० कोटी रुपयांपेक्षा अधिक. रसायन आणि अन्न प्रक्रिया असे कंपनीचे एकूण दोन विभाग आहेत. ऑक्झेलिक अॅसिडच्या उत्पादनात आणि निर्यातीत कंपनी भारतात अव्वल स्थानी आहे. मेयोनीज, टॉमेटो केचअप, चायनीज सॉस, जेम्स, सरबत, मॉकटेल, लोणचे आदी उत्पादनांची निर्मितीदेखील कंपनी करते. १९८२ साली स्थापन झालेल्या या कंपनीने २००९ मध्ये खाद्यान्न क्षेत्रात विस्तार केला आणि कंपनीच्या महसुलात ३९ कोटी रुपयांवरून २५० कोटी रुपये इतकी वाढ झाली. आजच्या घडीला देशातील २२ राज्यांतून कंपनीचा वावर आहे.
17 / 17
ध्वनील शेठ (संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्किलमॅटिक्स), देवांशी केजरीवाल (सहसंस्थापक, मुख्य उत्पादन अधिकारी, स्किलमॅटिक्स)- कंपनीचे स्थापना वर्ष - २०१७ कंपनीची उलाढाल ५०० कोटी रुपये इतकी आहे. कंपनीने १९९ कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी केली आहे. अभ्यासपूर्ण आणि रुची वृद्धिंगत करणाऱ्या विविध प्रकारच्या खेळांची निर्मिती करण्यात कंपनीने जगात आपला ठसा उमटवला आहे. भारताइतकेच कंपनीचे भक्कम अस्तित्व अमेरिका आणि युरोपातील देशात आहे. वॉलमार्ट, टार्गेट, हॅमलेज, हॉबी लॉबी या आणि अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रेडच्या दुकानांतून कंपनीच्या खेळण्यांची २० हजारांपेक्षा जास्त दुकानांतून विक्री होते.
टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025Kartik Aaryanकार्तिक आर्यनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAditi Tatkareअदिती तटकरे