Lok Sabha Elections 2024: सळसळते रक्त ठरवणार खासदार? १८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 11:59 IST
1 / 9लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.2 / 9या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा १८-१९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार ४५७ नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.3 / 9१८-१९ वयोगटात १,४१,४५७ मतदार आहेत, २०-२९ वयोगटात १७,५९,३२९, ३०-३९ वयोगटातील २१,५९,३२९ मतदार आणि ८० वर्षांवरील २,२६,४१९ एवढे मतदार आहेत. 4 / 9१८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार आहेत, जे प्रथमच लोकसभेला मतदान करत आहेत. 5 / 9पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात ७०,६९८ इतके मतदार आहेत. 6 / 9त्यापाठोपाठ रामटेक ४६,४१३, भंडारा-गोंदिया ३८,२६९, चंद्रपूर ३७,४८० आणि गडचिरोली-चिमूर ३३,५५९ असे एकूण २,२६,४१९ ज्येष्ठ मतदार आहेत. 7 / 9येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून सर्व मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. - एस.चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी8 / 9२१ राज्यांतील १०२ मतदारसंघात शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 9 / 9रिंगणात आठ मंत्री - नितीन गडकरी, किरेन रिजिजू, सर्वांनंद सोनोवाल, संजीव बलियान, जितेंद्र सिंह, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल, एल. मुरुगन