छान किती दिसते फुलपाखरू... By admin | Published: October 25, 2016 12:00 AM
1 / 10 राष्ट्रीय प्राणी वा पक्षी म्हणून एखाद्या पक्षी प्राण्याला गौरवले जाते फुलपाखराकडे मात्र आजपर्यंत दुर्लक्षच झाले आहे. राष्ट्रीय वा राज्यस्तरीय फुलपाखरू म्हणून कोणत्याही फुलापाखराला मान मिळालेला नाही. 2 / 10 फुलपाखरे ही अतिशय संवेदनशील असतात हवेच्या १० लाख रेणूंमध्ये गंधाचे तीन रेणूही एका फुलपाखराला दुस-याचा माग काढण्यासाठी पुरेसे असतात. गंधाच्या बाबतीत संवेदनशील असल्याने फुलपाखरू प्रदूषणातही टिकाव धरू शकतं. 3 / 10 फुलपाखरांचं खाणंही मोठं गमतीदार असतं. कुजलेल्या फळामध्ये प्रक्रिया होऊन तयार झालेले अल्कोहोल कुजलेल्या प्राण्यांच्या शरीरातील द्रवरूप क्षार कुजलेले खेकडे मासे यातील क्षार असे सर्व द्रवरूपी क्षार फुलपाखरे व पतंग शोषून घेतात. 4 / 10 तसे पाहता फुलपाखरांचे फुलपाखरांचे आयुष्य जेमतेम ३० दिवसांचे असते. तर काही फुलपाखरे अवघा एखादा दिवस जगतात. 5 / 10 संपूर्ण भारतात फुलपाखरांच्या सुमारे दीड हजार प्रजाती आढळतात. यापैकी महाराष्ट्रात ३०० च्या आसपास तर आंबोली व पारपोली येथे सुमारे २०४ प्रजाती आढळतात. 6 / 10 सौदर्ण बर्डविंग क्रुझर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉनमॉन पॅरिस पिकॉक कमांडर लेमन पॅन्सी चॉकलेट पॅन्सी रड स्पॉट ड्युक बॅरॉन इव्हिनिंग ब्राउन ग्रास यलो ऑरेंज टीप ही आणि अशी अनेक दुर्मिळ व आकर्षक २०४ प्रजातींची फुलपाखरं आंबोलीत पहायला मिळतात. 7 / 10 आंबोली येथील फुलपाखरू महोत्सवादरम्यान सावंतवाडी तालुक्यातील पारपोली गावाची फुलपाखरांचा गाव म्हणून निवड करण्यात आली. 8 / 10 फुलपाखरू आणि पतंग अशा दोन वर्गांमध्ये या कीटकाचे वर्गीकरण होते. फुलपाखरू साधारणत: दिवसाच उडते फुलांवर बसताना पंख मिटून बसते. तर पतंग ज्याला इंग्रजीत मॉथ असे म्हणतात ते रात्रीच्या वेळेस उडतात व फुलांवर बसताना त्याचे पंख उघडे असतात. 9 / 10 या महोत्सवादरम्यान फुलपाखरू उद्यान कसे उभे करावे व आपल्या अंगमात फुलपाखरे कशी बागडतील या विषयीचे मार्गदर्शन करण्यात आले. 10 / 10 कीटक प्रजातीत मोडणारे फुलपाखरू पुरातन काळापासून लहान-थोर सर्वांनाच आकर्षित करत आले आहे. फुलपाखरांच्या विविधतेची ओळख जास्तीत जास्त निसर्गप्रेमी पर्यटकांना व्हावी यासाठी मलबार निसर्ग संस्थेकडून कोकणातील आंबोली येथे नुकताच फुलपाखरू महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ( फोटो : निर्माण चौधरी काका भिसे व मलबार निसर्ग संस्था) आणखी वाचा