सावित्री नदीच्या पातळीत मोठी वाढ, महाड शहरात घुसले पुराचे पाणीजयंत धुळपअलिबाग, दि. २ - महाबळेश्वर येथे शनिवारी सकाळी संपलेल्या 24 तासात झालेला 195 मिमी पाऊस पडला आहे. तसेच शनिवार सकाळपासून सुरु असलेली पावसाची संततधार व 24 तासात महाड मध्ये झालेला 159 मिमी व पोलादपूर मध्ये झालेला 127 मिमी पाऊस व सकाळी 9.45 वाजता अरबी समुद्रातील भरतीमुळे महाबळेश्वरमध्ये उगम पाऊन महाड तालुक्यांतून वाहात जावून आंबेत(श्रीवर्धन) येथे समुद्रास मिळणाऱ्या सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाली. शनिवारी सकाळी 8 वाजता सावित्री नदी जल पातळी 6.30 मिटर झाली आहे. या नदिची धाेकादायक जलपातळी 6.50 मिटर आहे. परिणामी महाड शहारातील सुकटगल्ली(बाजारपेठ), बिरवाडी हायकल-सफर केंद्र मार्ग, नांगलवाडी एमआयडीसी मार्ग, आदी परिसरात सावित्री नदीच्या पूराचे पाणी घुसण्यास प्रारंभ झाला आहे. आपत्ती नियंत्रण यंत्रणेस सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. दस्तुरी नाका महाड ; एसटी अडकली पुराच्या पाण्यात ; प्रवासी सुखरुप महाड - नाते गावाला जाणारा नदीवरील पुल पाण्याखाली महाडच्या दादली पुलास सावित्री नदीचे पाणी पोचले रायगड जिल्ह्यात आज (2 जुलै2 016) सकाळी 8.00 पर्यंतचा (गेल्या 24 तासातील) पाऊस अलिबाग 61पेण 160 (सर्वाधिक)मुरूड 130पनवेल 150उरण 51कर्जत 106खालापूर 139माणगाव 113रोहा 87सुधागड 140तळा 145महाड 159पोलादपूर 127म्हसळा 107श्रीवर्धन 130 माथेरान 80~~~~~~एकूण आजचा 1885.70सरासरी आजची 117.86~~~~~~एकूण आजपर्यंतचा 14007.0सरासरी आजपर्यंतचा 875.44एकूण गेल्यावर्षीचा 14420.30सरासरी गेल्यावर्षीचा 901.27----------सर्वसाधारण पर्जन्यमानाची तुलनात्मक टक्केवारी (%) 28.67----------2016 जून महीन्यात सरासरी पाऊस 117.78