शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 2:27 PM

1 / 7
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांना बहुतांश जागांवरील जागावाटपाचा तिढा सोडवून उमेदवार घोषित केले आहेत. दरम्यान, भाजपाने महायुतीच्या जागावाटपात आपलं वर्चस्व राखतानाच मित्रपक्षांच्या वाट्याला गेलेल्या जागांवरही आपल्या पक्षातील नेत्यांना उमेदवारी मिळवून दिल्याचं दिसत आहे.
2 / 7
भाजपाने आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या काही नेत्यांची त्यांचे मतदारसंघ मित्रपक्षांकडे गेल्याने कोंडी झाली होती. त्यावर तोडगा काढत भाजपाने अशा नेत्यांची आजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट या मित्रपक्षांमध्ये मैत्रिपूर्वक निर्यात करून त्यांना तिथून लढण्याची संधी दिली आहे. या पैकी काही प्रमुख नेत्यांची नावं पुढीलप्रमाणे आहेत.
3 / 7
निवडणूक लढवण्यासाठी भाजपामधून मित्रपक्षांमध्ये गेलेल्या नेत्यांपैकी पहिले नेते आहेत ते म्हणजे राजकुमार बडोले. माजी मंत्री असलेल्या राजकुमार बडोले यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून निसटता पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवार गटाला सुटली होती. तसेच मनोहर चंद्रिकापुरे हे इथले विद्यमान आमदार आहेत. मात्र भाजपाने राजकुमार बडोले यांचा अजित पवार गटात पाठवले. तर अजित पवार यांनी चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापून राजकुमार बडोले यांना संधी दिली.
4 / 7
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपामधून अजित पवार गटात गेलेले दुसरे नेते आहेत ते म्हणजे संजयकाका पाटील. भाजपाचे माजी खासदार असलेले संजयकाका पाटील हे तासगाव कवठेमहाकाळ येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र हा मतदारसंघ अजित पवार गटाच्या वाट्याला गेल्याने संजयकाका पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. तसेच उमेदवारी मिळवली.
5 / 7
भाजपामधून अजित पवार गटात गेलेले तिसरे नेते आहेत ते म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर. भाजपाचे माजी खासदार असलेल्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेल्याने प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे.
6 / 7
भाजपामधून अजित पवार गटात गेलेले चौथे नेते आहेत ते म्हणजे निशिकांत पाटील. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना आव्हान देण्यासाठी निशिकांत पाटील यांना भाजपामधून पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
7 / 7
दरम्यान, महायुतीअंतर्गत भाजपामधून शिंदेगटामध्येही पक्षांतर झालं आहे. कोकणातील कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये भाजापा नेते निलेश राणे यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. तसेच जागावाटपात शिंदे गटाकडे गेलेल्या या जागेवर निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीBJPभाजपाRajkumar Badoleराजकुमार बडोलेNilesh Raneनिलेश राणे sanjaykaka patilसंजयकाका पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना