बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:13 PM
1 / 12 Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे यंदाही निवडणूक खूप रंजक बनली आहे. खासकरुन राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळे पक्षाचे संस्थापक शरद पवारांनी ही निवडणूक मनावर घेतली आहे. विशेष म्हणजे, ज्या नेत्यांना शरद पवारांनी राजकारणात आणले आणि मोठ-मोठी पदे दिली, त्यांनी विश्वासघात केल्यामुळे शरद पवार या निवडणुकीत पूर्ण ताकत लावत आहेत. 2 / 12 आपल्याच पुतण्याकडून मिळालेल्या विश्वासघातामुळे शरद पवारांनी अजित पवारांचा बारामतीत पराभव करण्यासाठी चक्रव्हू आखले आहे. यासाठी त्यांनी आपला नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांची निवड केली आहे. दरम्यान, फक्त अजित पवारच नाही, तर शरद पवारांनी पक्षातील अशा दहा नेत्यांची यादी तयार केली आहे, ज्यांचे जाणे त्यांच्या जिव्हारी लागले. अजित पवारांसह या दहा नेत्यांना पाडण्यासाठी शरद पवार खुद्द रणनीती तयार करत असल्याचे बोलले जात आहे. 3 / 12 छगन भुजबळ- शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जात होते. छगन भुजबळ तुरुंगात गेले, तेव्हाही शरद पवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पण, 2023 मध्ये अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडली. शरद पवारांना सोडून छगन भुजबळ अजितांच्या बाजूने गेले, तेव्हापासून शरद पवारांनी त्यांना आपल्या रडारवर ठेवले आहे. येवला हा छगन भुजबळांच मतदारसंघ आहे. 4 / 12 दिलीप वळसे पाटील- महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील हे एकेकाळी शरद पवारांच्या खूप जवळ होते. पवारांचे स्वीय सचिव असलेले वळसे पाटील हे अनेक सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. त्यांनीदेखील अजित पवारांसोबत जाऊन शरद पवारांचा विश्वासघात केला. अजित पवारांनी वळसे पाटलांना आंबेगावमधून पुन्हा उमेदवारी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार यांनी देवदत्त निकम यांना आंबेगावमधून उमेदवारी दिली आहे. निकम यांना स्थानिक खासदार अमोल कोल्हे यांचा पाठिंबा आहे. 5 / 12 हसन मुश्रीफ- शरद पवारांचे निकटवर्तीय हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शरद पवारांनी जोरदार तयारी केली आहे. मुश्रीफ यांनीही बंडखोरी करून अजित पवार गटात सामील झाले. शरद पवारांनीच मुश्रीफ यांना राजकारणात पुढे आणले. अजित पवारांनी कागलमधून मुश्रीफांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारंनी येथून भाजपच्या समरजित घाटके यांना मैदानात उतरवले आहे. 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या घाटके यांना 88 हजार मते मिळाली होती. मात्र, येथून मुश्रीफ 28 हजार मतांनी विजयी झाले होते. 6 / 12 नरहरी झिरवाळ- विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ हेही शरद पवारांच्या रडारवर आहेत. झिरवाळ हे दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अजित पवारांनी पुन्हा झिरवाळ यांना उमेदवारी दिली आहे. तर, झिरवळ यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार स्वतः रणनीती तयार करत आहे. अलीकडेच झिरवळ यांच्या मुलाला आपल्या गोटात आणण्यात शरद पवारांना यश आले. 7 / 12 संजय बनसोडे- एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री असलेले संजय बनसोडेही शरद पवारांच्या निशाण्यावर आहेत. उदगीरमधून निवडणूक लढवणाऱ्या संजय बनसोडे यांच्या विरोधात शरद पवारांनी सुधाकर भालेराव यांना उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये सुधाकर भालेराव यांनी उदगीरमध्ये संजय बनसोडे यांचा पराभव केला होता. 8 / 12 चेतन तुपे- पुणे जिल्ह्यातील हडसापर मतदारसंघाचे आमदार चेतन विठ्ठल तुपे हेही बंडखोरीच्या काळात शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले. 2019 मध्ये शरद पवारांनी तुपे यांना तिकीट देऊन हडसापरमधून विधानसभेवर पाठवले होते. बंडखोरीच्या वेळी यंग ब्रिगेडचे तुपे अजित पवारांसोबत जाणार नाहीत, अशी अपेक्षा होती. पण, आता तुपे यांच्या विरोधात शरद पवार यांनी संघटनेचे नेते प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे. 9 / 12 दत्तात्रेय भरणे- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये दत्तात्रेय भरणे विजयी झाले होते. बंडाच्या वेळी दत्तात्रेय भरणे अजित पवारांसोबत गेले. आता भरणे यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांना येथून उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी स्वतः शरद पवार गेम प्लॅन आखत आहेत. विशेष म्हणजे, सुप्रिया सुळे यांना 2024 मध्ये बारामती लोकसभेच्या इंदापूरमधून 26 हजारांची आघाडी मिळाली होती. 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील यांचा या जागेवरून अवघ्या 3 हजार मतांनी पराभव झाला होता. 10 / 12 भगवंतराव आत्राम- शिंदे सरकारमधील औषधमंत्री भगवंतराव आत्राम हेही एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे. आत्राम 2004 मध्ये अहेरी मतदारसंघातून आमदार ऱझाले. 2023 च्या बंडाच्या वेळी आत्राम अजित पवार गटात केले. आता शरद पवार यांनी अहेरी मतदारसंघातून आत्राम कुटुंबातील भाग्यश्री यांना उमेदवारी दिली आहे. भाग्यश्री या भगवंतरावांच्या कन्या असून त्या पूर्वी संस्थेचे कामकाज पाहत असत.. 11 / 12 आशुतोष काळे- कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हेही हिटलिस्टमध्ये आहेत. काळे यांचे आजोबा शंकरराव काळे हे शरद पवार यांचे मित्र होते. शंकररावांमुळेच 2019 मध्ये आशुतोष यांना तिकीट मिळाले होते. शरद पवार यांनी आता येथून संदीप वर्पे यांना उमेदवारी दिली आहे. व्यवसायाने वकील असलेले संदीप हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पवारांशी जोडले गेले आहेत. 12 / 12 धनंजय मुंडे- शिंदे सरकारमधील मंत्री, धनंजय मुंडे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. धनंजय मुंडेंनी काकाविरुद्ध बंड केल्यावर शरद पवारांनी त्यांना आपल्या पंखाखाली घेतले. 2019 मध्ये धनंजय यांनी शरद पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकली. पण, 2023 च्या बंडात धनंजय मुंडे अजित पवारांसोबत गेले. आता खुद्द शरद पवार धनंजय यांच्या विरोधात आहेत. अद्याप पक्षाने येथून उमेदवार दिलेला नाही, पण यासाठी मुंबईतील वाय.व्ही.चव्हाण सेंटरमध्ये रणनीती तयार करण्यात येत आहे. आणखी वाचा