Maharashtra Ballarshah, Chandrapur stations take top spot in railway beautification contest
चंद्रपूरमधील 'जंगलबुक' ठरलं देशात पहिलं By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 8:10 AM1 / 8महाराष्ट्रातील बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशनांनी रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.2 / 8या स्पर्धेत बिहारच्या मधुबनी स्थानकाने दुसरा क्रमांक पटकावला.3 / 8मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळानं या दोन्ही स्टेशनांवर राष्ट्रीय ताडोबा उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेतली चित्र रेखाटली आहेत.4 / 8रेल्वेकडून पारितोषिक जाहीर झाल्यानंतर ही छायाचित्रे सध्या नेटकऱ्यांना भुरळ घालत आहेत. 5 / 8या छायाचित्रांच्या माध्यमातून ताडोबा उद्यानातील समृद्ध वन्यजीवनाची झलक पाहायला मिळते.6 / 8या स्पर्धैेत तिसरा पुरस्कार संयुक्तरीत्या गुजरातमधील गांधीधाम, राजस्थानमधल्या कोटा आणि तेलंगणातल्या सिकंदराबाद स्टेशनांना मिळाला आहे. पहिल्या स्थान पटकावलेल्या विजेत्या स्टेशनला 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत.7 / 8दुसऱ्या स्थानी असलेल्या स्थानकांना 5 लाख रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या विजेत्या स्टेशनांना पुरस्काराच्या स्वरूपात 3 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. 8 / 8चंद्रपूर रेल्वे स्थानकावरचे जिने, भिंती सर्वच ठिकाणी वन्यजीवांच्या छबी चितारण्यात आल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications