शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 7:59 PM

1 / 10
विधानसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडीत जागावाटपावरून सातत्याने बैठका सुरू होत्या. २६० हून अधिक जागांवर मविआत एकमत झालं आहे. मात्र उर्वरित २८ जागांवरून तिन्ही पक्षांत प्रचंड रस्सीखेच आहे. त्यात काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आले आहेत.
2 / 10
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत, जागावाटपावर लवकर निर्णय घ्यायला हवा. काँग्रेस नेत्यांना वारंवार दिल्लीला यादी पाठवावी लागते असा आरोप करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जोरदार पलटवार केला.
3 / 10
संजय राऊत साहेब उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा मोठे असतील. त्यांना उद्धव ठाकरे साहेबांसोबत बोलावंच लागत नाही. त्यांनी केलेला निर्णय, त्यांचा फायनल असेल, तर ते मोठे नेते आहेत. आमच्या पक्षामध्ये एक प्रोटोकॉल आहे. हायकमांड आमचं दिल्लीत आहे. आम्हाला त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती द्यावी लागते. जयंत पाटील असतील तर त्यांना पवार साहेबांना माहिती द्यावी लागते. त्यांच्यात (शिवसेना यूबीटी) नसेल, तर तो त्यांचा भाग आहे असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी राऊतांना दिले आहे.
4 / 10
मविआतील या वादावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. स्वार्थासाठी झालेली ही आघाडी आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून झालेली ही आघाडी आहे. स्वार्थासाठी झालेली ही आघाडी असल्याने त्यात बिघाडी होणारच असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
5 / 10
महाविकास आघाडीच्या जागावाटपात विदर्भाच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात स्पर्धा सुरू आहे. विदर्भात काँग्रेसला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत. मात्र विदर्भ कुणाचं संस्थान नाही, आम्हीदेखील तिथे निवडणूक जिंकलेल्या आहेत. रामटेक, अमरावती या जागा लोकसभेला आम्ही काँग्रेसला सोडल्या होत्या. त्यामुळे विधानसभेला आम्हाला जागा मिळतील अशी अपेक्षा होती असं राऊतांनी सांगितले.
6 / 10
विदर्भात काँग्रेसनं जास्त जागा लढवाव्यात अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यादृष्टीने नाना पटोले जागावाटपात आग्रही भूमिका घेत आहेत. तर ठाकरे गटही विदर्भात ९ जागा मागत आहेत. त्यात दोन्ही पक्षातील वाद समोर आले आहेत. तर तुटेपर्यंत ताणायचं नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं असा इशारा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला आहे.
7 / 10
मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. २६० जागांवर एकमत झालं आहे. परंतु उर्वरित जागांवरून टोकाचा वाद झाला आहे. येत्या २-३ दिवसांत हा वाद मिटेल अशी आशा मविआ नेत्यांना आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत वादाचा भडका उडल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे.
8 / 10
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वादावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मला माहिती घेऊन बोलावे लागेल. एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीत थोडी खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायचे नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे.
9 / 10
त्याशिवाय सध्यातरी जागावाटपाबाबत काही मोठं झालंय असं माझ्या कानावर आलेले नाही. त्यामुळे जेव्हा माझ्या कानावर येईल त्यावेळी मी यावर भाष्य करेन. येत्या २-३ दिवसांत किंवा उद्याच जागावाटप जाहीर होऊ शकते. कारण चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
10 / 10
तर अद्याप जागावाटप जाहीर झालेले नाही. मविआत प्रत्येक पक्ष वेगवेगळा आहे. आमचं विलीनीकरण झालं नाही. आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलोय, लोकसभेला कमी जागा होत्या पण विधानसभेला जास्त आहेत. त्यामुळे आघाडीत चर्चा होतेय असं उद्धव ठाकरेंनी विदर्भाच्या जागावाटपाबाबत सांगितले.
टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४