शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उद्धव ठाकरेंची नवी खेळी, भाजपाला टेन्शन; अनेक दशकांनी इतिहास पुन्हा घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 12:22 PM

1 / 10
शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नव्या खेळीनं भाजपाला टेन्शन आले आहे. उद्धव ठाकरे भाजपा-शिंदे गटासमोर आव्हान उभं करणार आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा अनेक दशकांनी राजकीय इतिहास घडण्याची शक्यता आहे.
2 / 10
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात समाजवादी नेत्यांसोबत संवाद बैठक होणार आहे. या बैठकीनं उद्धव ठाकरेंना नवी ताकद मिळण्याची आशा आहे. समाजवादी नेत्यांच्या १५० जणांसोबत उद्धव ठाकरेंची आज बैठक होईल. धर्मनिरपेक्ष दलांसोबत आघाडीचा रोडमॅप या बैठकीतून तयार होईल असं सांगितले जाते. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक पार पडणार आहे.
3 / 10
पक्षातील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा संघटनेला बळकटी देण्यासाठी सज्ज आहेत. समाजवादी पक्षांसोबत नवीन आघाडी उघडून भाजपासमोर आव्हान उभं करण्यासाठी ठाकरे वेगवेगळी रणनीती आखत आहेत.
4 / 10
राज्यात अनेक दशकानंतर पुन्हा शिवसेना-समाजवादी पक्ष एकत्र येतील. आजच्या बैठकीनंतर शिवसेना उबाठा गट आणि समाजवादी पक्षांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब होऊ शकते. शिवसेनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत २२ वेळा धर्मनिरपेक्ष पक्षांशी युती झाली आहे. शिवसेनेने जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबतही युती केली होती
5 / 10
१९६८ च्या मुंबई महापालिकेत शिवसेनेने पहिली निवडणूक लढली. त्यात राष्ट्रीय पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाशी युती केली. इतकेच नाही तर आधी रिपल्बिकन पार्टीसोबतही युती होती. एका निवडणुकीत मुस्लीम लीगच्या उमेदवाराला शिवसेनेने समर्थन दिले होते. त्यामुळे आता पुन्हा पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या पाऊलांवर पाऊल टाकत राजकारण करू लागले आहेत.
6 / 10
जनता दल युनायटेडचे नेते आणि आमदार कपिल पाटील यांच्या माहितीनुसार, २४ ऑगस्टला पुण्यात समाजवादी विचारांवर चालणाऱ्या पक्षांशी आणि नेते, विचारवंतांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर आता मुंबईत दुसरी बैठक पार पडत आहे.
7 / 10
समाजवादी विचारांचे पक्ष आणि शिवसेना उबाठा गट भाजपाविरोधी इंडिया आघाडीत एकत्र काम करत आहे. इंडियाने महाराष्ट्रात एकत्र निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. समाजवादी पक्षाला राज्यात कमीत कमी ७-८ टक्के मतदान आहे.
8 / 10
समाजवादी पक्षांच्या मतदानाने इंडिया आघाडी आणखी मजबूत होईल असं आमदार कपिल पाटील म्हणाले. मुंबईत आज समाजवादी कुटुंबाची निवडक १५० लोकांसोबत बैठक होत आहे. त्यात विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते सहभागी असतील असंही त्यांनी सांगितले.
9 / 10
विशेष म्हणजे आजच्या बैठकीला कामगार नेते शशांक राव, जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी असीम राव, जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष निहाल अहमद यांची मुलगी सुभाष मालगी, शान ए हिंदही सहभागी होणार आहे. याच बैठकीत उद्धव ठाकरे समाजवादी पक्षातील कुटुंबासोबत संवाद साधणार आहेत.
10 / 10
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे पक्षासाठी नवीन राजकीय जमीन तयार करत आहेत. त्यात ठाकरेंनी आधी संभाजी ब्रिगेड, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. आता समाजवादी विचारांच्या विविध धर्मनिरपेक्ष छोट्या पक्षांसोबत युती करण्याच्या तयारीत आहेत.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSamajwadi Janata Party (National)समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय)