शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 2:35 PM

1 / 8
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्या वयाचा विचार केला असता असे दिसून येते की, सर्वच पक्षांनी सरासरी पन्नाशी ओलांडलेले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
2 / 8
सर्वांत तरुण उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत, तर सर्वांत वयोवृद्ध उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत.
3 / 8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ८६ उमेदवार उतरवले आहेत. त्यांच्या वयाची सरासरी ५१.३ इतकी आहे.
4 / 8
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांचे सरासरी वय हे ५३.७ इतके आहे.
5 / 8
भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुकीत १४९ जागा लढवत आहे. त्यांच्या उमेदवारांचे सरासरी वय ५३.९ इतके आहे.
6 / 8
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५९ जागा लढवत आहे. त्यांच्या उमेदवारांच्या वयाची सरासरी ५४ इतकी आहे.
7 / 8
काँग्रेस पक्षाचे १०१ उमेदवार निवडणूक लढवत असून, त्यांच्या वयाची सरासरी ५४.५ इतकी आहे.
8 / 8
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ८१ जागा लढवत आहे. त्यांच्या उमेदवारांच्या वयाची सरासरी ५४.७ इतकी आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा