शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 1:54 PM

1 / 7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्षांनी प्रत्येक निवडणुकीत किमान ८ ते २४ टक्क्यांपर्यंत मते ओढण्यात यश मिळविले आहे.
2 / 7
१९९५ मध्ये भाजपला ३२.१६ %, काँग्रेसला ३१.२३% तर शिवसेनेला २७.७% मते मिळाली होती.
3 / 7
त्याखालोखाल अपक्षांना २३.६३% मते मिळाली होती. प्रत्येक निवडणुकीत अपक्षांच्या मतांमुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांवर मोठा परिणाम होत असल्याचे आकडेवारीतून दिसते.
4 / 7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या इतिहासात अपक्ष उमेदवारांना सर्वाधिक मते १९९५ मध्ये मिळाली होीत. २३.६३ टक्के मते अपक्षांना मिळाली होती.
5 / 7
त्यापूर्वी १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली होती. या निवडणुकीत १७.४९ टक्के मते अपक्षांना मिळाली होती.
6 / 7
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपक्ष उमेदवारांच्या झोळीत सर्वात कमी मते २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत पडली होती. या निवडणुकीत चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. ४.७१ टक्के मते अपक्षांना मिळाली होती.
7 / 7
१९६२ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतेही लक्षणीय होती. १६.७४ टक्के मते अपक्ष उमेदवारांना मिळाली होती.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी