Making Anandvan the first 'Smart Village' was An ambitious project of Dr. Sheetal Amte
Dr. Shetal Amte Suicide : आनंदवनला पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं हा होता डॉ. शीतल आमटेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प By पूनम अपराज | Published: November 30, 2020 4:32 PM1 / 10शीतल आमटे या शिक्षणाने डॉक्टर होत्या. त्या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात होत्या. तर डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे त्यांचे आई-वडील आहेत. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाकार्याने वेगळी ओळख निर्माण केलेल्या महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. (Photos - twitter/AmteSheetal )2 / 10ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये या आनंदवनाची स्थापना केली. त्यामुळे संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना याठिकाणी आश्रय मिळाला. बाबांनी त्यांची सेवा केली. त्यांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. आनंदवनला पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा खेडय़ांनाच सक्षम करून स्मार्ट करण्याची त्यांची योजना होती.3 / 10भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सामाजिक क्षेत्रात कामाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. शीतल आमटे यांनी मशाल आणि चिराग या कार्यक्रमांची उभारणी केली होती. त्याच्या त्या संस्थापक होत्या. त्यांनी नुकतंच निजबल नावाचं एक सेंटरही सुरु केलं होतं.4 / 10याअंतर्गत शारीरिक अपंगत्व आलेल्या नागरिकांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना विविध कौशल्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन देण्यासाठी काम केलं जात होतं. 5 / 10‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या अपंगांसाठी असलेल्या शाळांसाठी शीतल यांनी काम पाहिलं. त्यात अपंगांच्या शिक्षणात गुणवत्ता आणणे आणि त्यांच्या शिक्षकांची क्षमता वाढवण्यावर त्या मुख्यत्वे भर देण्यास त्यांचं प्राधान्य होतं.6 / 10डॉक्टरीसेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रेनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन करणं तसेच आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं, अपंगांसाठी ‘निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’ उपक्रम राबवणे, ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या शाळांचं डिजिटलाझेशन किंवा मियावाकी पद्धतीने चार जंगलं वसण्याचं पर्यावरणीय योगदान करत आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉ. शीतल आमटे यांचा सशक्तपणे पुढे चालवत होत्या.7 / 10‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चा ‘यंग ग्लोबल लीडर’ पुरस्कारही डॉ. शीतल यांना प्रधान करण्यात आला होता. 8 / 10आजोबा बाबा आमटे, आईवडील विकास-भारती आमटे यांच्यासह संपूर्ण आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टीने डॉ. शीतल यांनी २००३ मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतले. 9 / 10शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. 10 / 10डॉ. शीतल या गौतम करजगी यांच्याशी २५ ऑक्टोबर २००७ साली विवाहबंधनात अडकल्या. नंतर अपंगांचं केवळ शिक्षण, प्रशिक्षणच नव्हे तर त्यांना रोजगार मिळण्यासाठी ‘निजबल’ हा उपक्रम २०१५ पासून डॉ. शीतल यांनी हाती घेतला होता. तेथे १८ ते ३५ वयोगटातील अपंग आहेत. या केंद्रात वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण प्रशिक्षण, वेगवेगळ्या उद्योगात नोकरी लावून देणं, व्यक्तिमत्त्व विकास, समुपदेशन जेणे करून स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मविश्वासानं ते आयुष्य जगू शकतील. आतापर्यंत शेकडो मुले पायावर उभी राहिलेली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications